Pimpri : वेगाने गाडी चालवतो म्हणून विद्यार्थ्याला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – वेगाने गाडी (Pimpri) चालवतोस म्हणत टोळक्याने दोन्ही विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली आहे. ज्यामध्ये एकजण बेशुद्ध झाला असून, तो सध्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हा सारा प्रकार बुधवारी (दि.23) दुपारी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयासमोर घडली.

याप्रकरणी शिवराज मंगेश जाधव (वय 17 रा.काळेवाडी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस ठाण्यात रोहित माटे (वय 22) व त्याचे पाच ते सहा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र आशितोष बाळासाहेब पांडढवळे हे डि.वाय.पाटील कॉलेजमधून त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. यावेळी रोहीत आला व त्याने फिर्यादीच्या गाडीला अडवून गाडी हळू चालवता येत नाही का? माझा भाचा तुझ्या गाडीखाली आला असता म्हणत फिर्यादीला हाताने मारहाण करण्यात आली. यावेळी फिर्यादी यांचे मित्र निलेश चव्हाण व साद सय्यद तेथे आले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली.

Pune : पुण्यात ट्रक अपघाताचे सत्र कायम; सहा गाड्यांचे पुन्हा नुकसान

त्यानंतर आरोपीने त्याचे आणखी साथीदार (Pimpri) बोलावले. दुचाकीवरून येवून त्यांनी फिर्यादी व त्यांचा मित्र आशितोष यांना लाकडी दांडक्याने व बांबूने मारहाण करण्यात आली. यामध्ये फिर्यादी जखमी झाले, तर आशितोष याला डोक्यात जोरात बांबूने मारल्याने तो बुलेटसह खाली पडला. यावेली आरोपींनी बुलटचेही नुकसान गेले. यामध्ये आशिष गंभीर जखमी झाला, ज्यामध्ये तो बोशुद्ध पडला. त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल कऱण्यात आले असून आरोपीवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पिंपरी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.