Pimpri : स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घ्यावी -बाळा भेगडे

श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था आणि शिवछत्रपती प्रतिष्ठाण, थेरगाव यांच्या वतीने इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव

एमपीसी न्यूज – सध्या स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घ्यायला हवी. यातून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडणार आहे. विद्यार्थी घडल्याने देश घडणार आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले.

श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था व शिवछत्रपती प्रतिष्ठाण थेरगाव यांच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ चिंचवड येथे पार पडला. कामगार पुनर्वसन, भूकंप राज्यमंत्री बाळा बेगडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

  • कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खासदार श्रीरंग बारणे होते. यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेवक निलेश बारणे, सचिन भोसले, नगरसेविका रेखा दर्शिले, शहर प्रमुख योगेश बाबर, जिल्हा युवसेना समन्वयक जितेंद्र ननावरे, शहर महिला संघटिका उर्मिला काळभोर, पिंपरी विधानसभा महिला संघटिका सरिता साने, चिंचवड विधानसभा महिला संघटिका अनिता तुतारे, उपशहर प्रमुख सोमनाथ गुजर, लहू नवले, दिपाली गुजर, चिंचवड विधानसभा युवसेना अधिकारी विश्वजित बारणे, पतसंस्थेचे सर्व संचालक उपस्थितीत होते.

श्री दत्त नागरी पतसंस्था आणि छत्रपती प्रतिष्ठान मागील अनेक वर्षांपासून थेरगाव परिसरातील दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण विध्यार्थांचा विषेश गुणगौरव समारंभ आयोजित करत आहे. संस्था विद्यार्थांचे मनोबल वाढावे त्यांना शैक्षणिक मदत व्हावी, या दृष्टीकोनातून काम करत असून अनेक सामाजिक उपक्रम संस्थेतेच्या वतीने राबविले जात आहेत. कार्यकमात सुमारे 550 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

  • यावेळी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले, स्पर्धेत टिकून राहणे कठीण आहे. मेहनत हाच त्यावर पर्याय आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांनी मेहनत करावी. यश आपोआप आपल्याकडे खेचले जाईल. वेळेचे नियोजन करावे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी वेळेचे नियोजन अतिशय महत्वाचे आहे. तसेच श्री दत्त नागरी संस्था करीत असलेल्या उपक्रमांचे आणि संस्थेच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

त्यानंतर खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था व शिवछत्रपती प्रतिष्ठाण मागील अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवीत आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, हा या कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू आहे. परीस्तिथीवर मात करून अनेक विद्यार्थी परीक्षेत उतीर्ण झाले आहेत. त्यांच्या यशामागे आई-वडील व गुरुजनांचे मोठे योगदान आहे. आपल्या शैक्षणिक वाटचालीत आपल्या परिवाराने आपल्यासाठी घेतलेले परिश्रम विद्यार्थ्यांनी जीवनात कधीही विसरू नये. शिक्षणाबरोबरच आपल्याला आलेल्या संधीचा व वेळेचा सदुपयोग करावा.

  • आमदार गौतम चाबुकस्वार यांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी सामाजिक परिस्थितीचे भान ठेऊन सामाजोपयोगी कामात सहभाग घ्यावा, असे अवाहन केले. कार्यक्रमाचे प्रस्थाविक अॅड. दिलीप पाटील यांनी केले. धनाजी बारणे यांनी आभार मानले. कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.