Pimpri : ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी दिला बाप्पाला निरोप

एमपीसी न्यूज- जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटी शाळेत सण-उत्सवांमागील व्यापक विचार लक्षात घेऊन जाणीवपूर्वक शालेय गणेशोत्सवाचा उपक्रम राबवित विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी स्वतः ढोल ताशा वाजवत गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

महत्त्वाचे म्हणजे महिना-दीड महिना आधी वर्गातील मुलांना पर्यावरण पूरक गणपती मूर्ती आणि गणेशोत्सव या विषयीची माहिती संवादातून अगदी सोप्या भाषेत त्यांचे वय लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने सांगण्यात आली. या मुलांना शाडू मातीची मूर्ती, त्याचे महत्त्व, गणपतीची सजावट, पूजेची तयारी, पत्री, नैवेद्य इ.विषयीची माहिती देण्यात आल्याचे संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाडू मातीची गणेशमूर्ती, मोदक, जास्वदींची फुले, रंगवलेल्या पताका, सजावट मुलांना खूप काही शिकवून गेली. गणपतीला कोणते फूल आवडते? त्याचा रंग कोणता असतो? नैवेद्य काय करतात? मोदक कशाचा करतात? याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.