Pimpri: दुबईतील नृत्य, नाट्य, गायन स्पर्धेत सुवर्ण, रौप्य, कांस्य पदके जिंकणा-या विद्यार्थ्यांचा गौरव 

एमपीसी न्यूज – दुबई येथे पार पाडलेल्या ‘ग्लोबल कल्चरल ऑलिम्पियाड 2018’ या नृत्य नाट्य व गायन स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहरातील सुप्रियाज डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदकासह चौदा पदके प्राप्त केली आहेत. त्यानिमित्त महापौर राहुल जाधव आणि सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला आहे. पथकाच्या प्रमुख सुप्रिया धाईंजे संत यांचा देखील सन्मान करण्यात आला.

महापालिकेच्या मुख्य इमारतीतीतल महापौरांच्या दालनात आज (शुक्रवारी) हा सत्कार सोहळा पार पडला. दुबई येथील मदिनाथ थिएटर झुमिराह तेथे झालेल्या अखिल भारतीय सांस्कृतिक संघ ऑफिशियन पार्टनर युनिस्को आयोजित ‘ग्लोबल कल्चरल ऑलिम्पियाड 2018’ या नृत्य नाट्य व गायन स्पर्धेत नृत्य विभागात सुवर्ण, रौप्य, कांस्य अशी एकूण 14 पदके या पथकाने जिंकली आहेत. या स्पर्धेचे परीक्षण पद्मश्री डॉ. पंडीत दर्शना जव्हेरी ( नृत्य गुरु) डॉ. जी प्रतिश बाबू, ज्ञानरथ पुरस्कार विजेत्या उज्ज्वला नगरकर आणि नेहा पाटकर यांनी केले.

या स्पर्धेत भारतातील आणि भारताबाहेरील संस्थांचा सहभाग होता. सुप्रियाज डान्स अकॅडमीच्या संस्थापिका सौ.सुप्रिया धाइंजे (संत) यांना उत्कृष्ट गुरु पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रथम पारितोषिक विजेते (सुवर्ण पदक) अनुजा इमानदार, समृद्धी यादव, खुशी हेगडे आणि स्वरा जांबवडेकर, व्दितीय पारितोषिक विजेते (रौप्यपदक) श्रावणी चौडकर अनुष्का शेडगे, निशा शेळके आणि सुप्रिया संत, तृत्तीय पारितोषिक विजेते (कांस्य पदक) श्रेया शिंदे, सई टोणगावकर, मेडीटोरिस अवार्ड विजेते सोहम शेटे, वेदांत वाडेकर, प्रिशा बन्सल सृष्टी सक्सेना, हिमानी पुराणिक, अद्विता अगरवाल या सर्वांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.