BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : कर्तृत्ववान महिलांचे चरित्र अभ्यासून त्याद्वारे प्रगती करावी -प्रिया जोग

एमपीसी न्यूज -“इच्छा व्यक्त करा, संधी मिळेल. मिळालेल्या संधीचे सोने करा, अशी प्रेरणा आपल्याला भारतातील पहिल्या महिला डॉ. आनंदी गोपाळ जोशी यांच्या चरित्रातून मिळते. आपल्या देशाच्या विकासात महिलांचेही योगदान फार मोठे आहे. म्हणून कर्तृत्ववान महिलांचे चरित्र अभ्यासून त्याच्या आधारे आपण प्रगती केली पाहिजे,” असे मत प्रसिद्ध कथालेखिका, व्याख्यात्या प्रिया जोग यांनी व्यक्त केले.

चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त त्या बोलत होत्या. यावेळी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य आसाराम कसबे, मुख्याध्यापक जगन्नाथ देविकर, कवयित्री वैशाली अडागळे, आदिशक्ती ग्रुपच्या महिला अधिकारी उपस्थित होत्या.

  • महिला दिनाचे औचित्य साधून पाच वेळा राष्ट्रीय पातळीवर तर पाच वेळा राज्य पातळीवर, जिल्हा स्तरावर एकूण ६२ पदके मिळविणाऱ्या मतिमंद असणा-या आणि क्रांतिवीर चापेकरच्या माजी विद्यार्थिनी कु.कस्तुरी नरेश मोरे हिचा सन्मान आसाराम कसबे, प्रिया जोग यांच्या हस्ते करण्यात आला.

राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी कु.संजना गायकवाड हिचासुद्धा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या वतीने आसाराम कसबे, तसेच कवयित्री वैशाली अडागळे, संजना गायकवाड, विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.

  • महिला दिनानिमित्ताने आदिशक्ती ग्रुपच्या वतीने विवेकानंद केंद्राचे युवाप्रमुख रोहित शेणाँय यांच्या हस्ते उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like