Pimpri : नाकामधून फुफ्फुसात गेलेले बांगडीचे लटकन बाहेर काढण्यात यश; तीन वर्षीय मुलीवर आठ तास चालली शस्त्रक्रिया

एमपीसी न्यूज – तीन वर्षाच्या मुलीने खेळता खेळता बांगडीला (Pimpri)असलेले लटकन चुकून नाकातून थेट फुफ्फुसात गेले. पण त्याची माहिती तिच्या कुटुंबियांना नव्हती. मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने मुलीच्या कुटुंबियांनी तिला पिंपरीच्या डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले.

रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्रॉन्कोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला आणि श्वसनलिकेला इजा न होता ती वस्तू बाहेर काढण्यात रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले. बाहेर काढलेली वस्तू ही बांगडीचे प्लास्टिकचे लटकन होते. त्यामुळे मुलीला जीवदान मिळाले. ही शस्त्रक्रिया तब्बल आठ तास चालली.

PCMC : शहरात 1351 कुणबी नोंदी

मुलीला ताप आणि खोकल्याचा त्रास (Pimpri)झाल्याने तिला नऊ सप्टेंबर रोजी पिंपरीच्या डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दुपारी उपचारासाठी दाखल केले. रात्री उशिरापर्यंत त्या मुलीच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. त्या दरम्यान मुलीला श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच मुलीला न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्यावेळी आई वडिलांकडून तिला काय झाले आहे याची माहिती नक्की देऊ शकले नाही.

त्यावेळी डॉक्टरांनी मुलीच्या एकूणच वैद्यकीय मूल्यमापनामध्ये शंका आल्याने एचआरसीटी करण्याचा निर्णय घेतला. ‘एचआरसीटी’ अहवाल आल्यानंतर डॉक्टरांची शंका खरी निघाली. तिच्या अहवालात फुफ्फुसात काहीतरी वस्तू अडकल्याचे दिसत होते.

दुसऱ्याच दिवशी डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटीच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. शैलजा माने यांच्या नेतृत्वाखाली बालरोग इन्टेसिव्हिस्ट डॉ. मनोज पाटील, बालरोग शल्यविशारद डॉ. धनंजय वझे, बालरोग शल्यविशारद डॉ. प्रणव जाधव, डॉ. रश्मी पाटील, बालरोग भूलतज्ज्ञ डॉ. सोनल खटावकर, डॉ. श्वेता सिंग यांच्या पथकाने सुमारे आठ तास त्या चिमुकलीवर ब्रॉन्कोस्कोपीची प्रक्रिया केली. या गुंतागुंतीच्या प्रक्रियेदरम्यान, मुलीचा श्वास सुरू ठेवावा यासाठी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर ब्रॉन्कोस्कोपीची प्रक्रिया करण्यात आली. मुलीच्या श्वसनलिकेला कोणतीही इजा न होता तेथे अडकलेला तो बांगडीच्या प्लास्टिकचे लटकन बाहेर काढण्यात यश आले.

हे मोठे आव्हानात्मक आणि गुंतागुंतीचे होते. लटकन काढल्यानंतर फुफ्फुसाच्या उजव्या बाजूचा भाग विस्तारणे शक्य झाले. या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी सुमारे आठवडापूर्वी हा प्रकार घडल्याचे समोर आले. मुलीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे लक्षात येताच तसेच तिला ताप आणि संसर्ग वाढल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल केले होते. ब्रॉन्कोस्कोपी केल्यानंतर तीन दिवस त्या मुलीला तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यानंतर तिची प्रकृती सुधारल्याने तिला घरी पाठविण्यात आले.

पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे (अभिमत विद्यापीठ) कुलपती डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, ‘अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सेवा रुग्णांना उपलब्ध करून देताना देशातील आरोग्यसेवेचा दर्जा वाढविण्यासाठी तसेच नागरिकांना चांगले आरोग्यमयी जीवन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा रुग्णालयात उपलब्ध करून आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांना आव्हानात्मक आणि गुंतागुंतीच्या केसेसमध्ये रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य व्हावे यासाठी आम्ही आरोग्यसेवा उत्तम करण्यासाठी कार्यरत आहोत.’

Pune : कुरूलकर याचा जामीन अर्ज फेटाळला

पिंपरीच्या डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बालरोग विभाग प्रमुख डॉ. शैलजा माने म्हणाल्या, ‘लहान मुलांच्या शरिरात गेलेल्या वस्तूंचे वेळीच शोध घेतला नाही तर गुंतागुंत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तीन वर्षाच्या मुलीच्या शरिरात प्लास्टिकच्या बांगडीचे लटकन श्वसननलिकेत अडकले होते. तो एक्स रे, सीटी स्कॅनमध्ये स्पष्ट समजत नाही. परंतु, श्वसननलिकेत नेमके काय गुंतागुंत झाले आहे याचा शोध घेण्यासाठी ब्रॉन्कोस्कोपीचा तज्ज्ञांनी निर्णय घेतला आणि त्यातून हा तुकडा बाहेर काढणे शक्य झाले. त्यामुळे मुलीला जीवदान मिळाले.

अनेक लहान मुलामंध्ये यापूर्वी शेंगदाणा, डाळिंबाचे दाणे, सिताफळ, सुपारी, मका आदी खाद्यपदार्थ श्वसननलिकेत अडकल्याचे आढळले होते. तसेच छोटी नाणी, अंगठी, सेफ्टी पिन, हेअर पिन यासारख्या वस्तू पोटात गेल्याने आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वीरित्या काढून यापूर्वी अनेक बालकांना जीवदान दिले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी. तसेच अशा वस्तूंचा वापर टाळावा.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.