Pimpri : कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षेत विश्वास स्पोर्ट्स क्लबच्या विद्यार्थ्यांचे यश

एमपीसी न्यूज – महिंद्रा अँथेईआ (Pimpri) पिंपरी या ठिकाणी युनिव्हर्सल शोतोकान कराटेदो अससोसिएशनच्या वतीने कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षा आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत विश्वास स्पोर्ट्स क्लबच्या ब्लॅक बेल्ट परीक्षेत मुले व मुली अशा एकूण 6 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.

ब्लॅक बेल्ट परीक्षेचे आयोजन हे अंकुश तिकोने यांनी केले होते. अंकुश तिकोने (Technical Director) हे युनिव्हर्सल शोतोकान कराटे दो असोसिएशन मार्फत पिंपरी-चिंचवडचे काम पाहतात.

ब्लॅक बेल्ट परीक्षा देण्यासाठी कमीत कमी 4 वर्षाचा कालावधी लागतो. या परिक्षेसाठी तयारीची  खूप अगोदरच सुरुवात करावी लागते. ब्लॅक बेल्टच्या परीक्षेत सहभाग घेण्यासाठी अगोदरच्या 8 परीक्षेचे टप्पे पार करावे लागतात. त्यानंतरच ब्लॅक बेल्ट परीक्षा आयोजित करण्यात येते.

Uddhav thackeray : …. म्हणून मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला : उद्धव ठाकरे 

तसेच, प्रत्येक टप्प्यात विद्यार्थ्यास स्वतःची क्षमता, गुणवत्ता आणि योग्यतेचे प्रमाण द्यावे लागते. विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसाचे शिबिर आयोजित करून प्रशिक्षण देण्यात आले. शिबिरामध्ये कुमिते व काता तसेच आत्मसंरक्षण, शरीर मजबूत करणे आणि काताचे नवीन प्रकार याचे प्रशिक्षण देण्यात (Pimpri ) आले आणि सहाव्या दिवशी परीक्षा घेण्यात आली.

मुलांनी संपादन केलेले यश पुढील प्रमाणे –

अत्रेयी सील A+ ग्रेड सहितप्रथम क्रमांक, गायत्री जोशी A ग्रेड सहित द्वितीय क्रमांक आणि हमसिनी कंचर्ला B+ ग्रेड सहित तृतीय  क्रमांक नोंदविले तसेच राघव केंजळे B ग्रेड, प्रणव जगताप B ग्रेड आणि यथार्थ शर्मा B ग्रेड प्राप्त करून आपले यश नोंदविले  आहे.

विध्यार्थाना NIS प्रशिक्षक,वरिष्ठ प्रशिक्षक तसेच विश्वास स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक  विश्वास मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच प्रशिक्षक सूर्यकांत वाघमारे व नवनाथ नवघणे यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.