BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : “तान्हाजी” ची यशस्वी घोडदौड सुरूच….!; सिनेमा 200 करोड क्लबमध्ये समाविष्ट

एमपीसी न्यूज – 22 दिवस उलटून गेल्यानंतर हि प्रेक्षकांची गर्दी खेचून आणण्यास “तान्हाजी” सिनेमा यशस्वी होत आहे. नुकताच “तान्हाजी” सिनेमाने 200 कोटी कमाईचा टप्पा पार केला. अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘तान्हाजी – द अनसंग वॉरीयर’ या सिनेमाने 200 कोटी कमाईचा टप्पा नुकताच पूर्ण केला. नरवीर तान्हाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ल्यावर केलेल्या पराक्रमाची गाथा या सिनेमाद्वारे दाखवण्यात आलेली आहे. 10 जानेवारीला प्रदर्शित झालेला हा सिनेमा आता 200 करोड क्लबमध्ये समाविष्ट झालेला आहे. सिनेमामध्ये ‘नरवीर तान्हाजी’ची मुख्य भूमिका साकारणाऱ्या अजय देवगणने ट्विट करत सिनेमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.

सुरवातीला सिनेमा बऱ्याच दृश्यांवरून आणि कथेवरून वादाच्या भोवऱ्यात सापडला होता तरीही तान्हाजी – द अनसंग वॉरीयर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच कंगना रानौत ची मुख्य भूमिका असलेला “पंगा” आणि नंतर प्रदर्शित झालेला वरून धवन आणि श्रद्धा कपूर यांचा डान्स वर आधारित “स्ट्रीट डान्सर” या सिनेमानं ऐवजी “तान्हाजी – द अनसंग वॉरीयर”ला प्रेक्षक जास्त पसंती देत आहेत

सन १६७० रोजी झालेल्या कोंढाणाच्या (आत्ताचा सिंहगड) लढाईत  नरवीर तानाजी मालुसरे यांनी भाऊ सूर्याजी मालुसरे, शेलार मामा आणि मोजके मावळे सोबत घेऊन चढाईस अत्यंत अवघड कोंढाणा सर केला होता आणि स्वराजात परत मिळवला होता. उदय भान राठोड नावाचा राजपूत त्यावेळेला या गडाचा किल्लेदार होता. ह्याच लढाईमध्ये नरवीर तान्हाजी मालुसरे धारातीर्ती पडले आणि  शिवरायांनी उद्गार काढले “गड  आला पण सिंह गेला”.

सिनेमामध्ये उदय भान राठोड ची भूमिका अभिनेता सैफ अली  खानने साकारली आहे तर काजोल ने तान्हाजी ची पत्नी सावित्रीबाई यांची भूमिका साकारली आहे तसेच मराठमोळा शरद केळकर शिवरायांच्या भूमिकेत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like