Pimpri : रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार सुप्रसिद्ध नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे चापेकर यांना प्रदान

एमपीसी न्यूज- रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार यंदा सुप्रसिद्ध नृत्यांगना डॉक्टर सुचेता भिडे-चापेकर यांना प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार वितरण समारंभाला डिस्ट्रिक गव्हर्नर इलेक्ट रोटरियन रवी धोत्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी, सचिव जगमोहन सिंह व जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी व क्लबचे सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन व्यावसायिक पुरस्कार समितीचे अध्यक्ष ए.आर. रंगनाथन यांनी केले. एन निरुपमा यांनी डॉ. चापेकर यांची ओळख करून दिली तर व एन उमा यांनी आभार मानले.

आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाने यशाचे शिखर गाठणाऱ्या आणि समाज उन्नतीसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.