Pimpri : सांगवीच्या 5 अधिका-यांच्या अचानक बदल्या; पोलिस वर्तुळात चर्चेला उधाण

2 अति-वरिष्ठांसह 8 वरिष्ठ अधिका-यांच्या अचानक बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पुन्हा फेरबदल करण्यात आला आहे. दोन पोलीस उप आयुक्तांसाह तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दोन पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस उपनिरीक्षक अशा एकूण दहा अधिका-यांच्या अचानक बदल्या करण्यात आल्या आहेत. या दहा अधिका-यांमध्ये पाच अधिकारी सांगवी पोलीस ठाण्यातील आहेत. अचानक एकाच पोलीस ठाण्यातील पाच अधिका-यांची बदली झाल्याने पोलीस वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. मात्र सांगवी पोलीस ठाण्यातील निरीक्षक (गुन्हे) पदावर अद्याप कोणाचीही नियुक्‍ती करण्यात आली नाही.
बदली झालेले अधिकारी (कुठून – कुठे) :
पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे (मुख्यालय ते परिमंडळ दोन)
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (परिमंडळ दोन ते मुख्यालय)
_MPC_DIR_MPU_II
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे (सांगवी ते वाहतूक शाखा)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे (चिंचवड ते सांगवी)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे (निगडी ते चिंचवड)
पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे (देहूरोड – गुन्हे ते निगडी)
पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे (सांगवी – गुन्हे ते नियंत्रण कक्ष)
सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड (सांगवी ते विशेष शाखा)
सहाय्यक पोलीस निरीक्षक खताळ (सांगवी ते दोघी)
पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर (सांगवी ते हिंजवडी)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.