BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: पवना धरणात जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचडकरांची तहान भागविणा-या पवना धरणात 18.02 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जुलैअखेर पुरेल इतका आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत तरी शहरासाठी आणखी पाणी कपात करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेने सुरवातीला आठवड्यातून एक दिवस पाणी बंद केले होते. त्यानंतर पाणी समस्या तीव्र होण्याची शक्‍यता पाहता दिवसाआड पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने पाणी कपात करण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने अवलंबले आहे. पवना धरणात सध्या एकूण पाणीसाठा 74.58 दशलक्ष घनमीटर इतका आहे. त्यातील उपयुक्त साठा 43.44 दशलक्ष घनमीटर इतका आहे. गेल्या 24 तासांमध्ये धरण क्षेत्रात पाऊस झालेला नाही.

मान्सूनचे आगमन काहीसे लांबले आहे. परंतु, मान्सूनचे आगमन लांबले असले. तरी, जुलै अखेरपर्यंत पुरु शकेल, इतके पाणी पवना धरणात अजून शिल्लक आहे. मान्सून सुरू झाल्यानंतरही एक महिना पुरेल इतका 18.02 टक्के पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासियांवर आणखीन पाणी कपातीचे संकट ओढावणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

.