Pimpri : सुहानी फुलसुंदर, अब्दुल मुकिम, आर्या चिद्दरवार डिजिटल वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

एमपीसी न्यूज – ‘इसिए’ या सामाजिक संस्थेकडून जागतिक जलदिन निमित्तज्ञ आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मराठी गटात सुहानी फुलसुंदर, हिंदी गटात अब्दुल मुकिम आणि इंग्रजी गटासाठी आर्या जयंत चिद्दरवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

ही स्पर्धा कोरोनाच्या सावटामुळे रद्ध केली होती आणि तीच स्पर्धा डिजिटल स्वरूपात 5 एप्रिलला पार पडली. स्पर्धेत 78 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातील पात्र ठरलेल्या 61 स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी करुन घेण्यात आले.

या स्पर्धेसाठी स्वतःच्या घरातून मोबाईल वरुन व्हिडीओ बनवून पाठविण्यात आला होता.त्यासाठी वेळमर्यादा फक्त 5 मिनिट होती. आई, वडील, आजी आजोबा यांच्या समवेत चित्रण करण्यात आले होते. कुटुंबातील सदस्य व्हिडीओमध्ये दिसत होते. मराठी 40,  हिंदी 10 आणि इंग्रजीच्या 11 स्पर्धकांनी अंतिम फेरीत थडक मारली होती.

या संघानी प्रथम क्रमांक पटकावला 

मराठी गट : सुहानी फुलसुंदर, विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल
हिंदी गट – कुमार अब्दुल मुकिम, श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय
इंग्रजी गट – कुमारी आर्या जयंत चिद्दरवार , पोतदार स्कूल मोशी यांनी बाजी मारली.

उर्वरित निकाल कार्यक्रमाच्या ठिकाणी जाहीर होणार आहेत. प्रसंगी सर्व स्पर्धकांना सहभाग पत्र टाटा मोटर्स, इसिए, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणी विभाग यांच्याकडून दिले जाणार आहेत. प्रत्येक गटात प्रथम 3 आणि 3 बक्षिसे उत्तेजनार्थ दिली जाणार आहेत. बक्षीस समारंभाची तारीख लवकरच कळविली जाणार आहे. ज्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यांनी त्यांच्या शाळे मार्फत इसिए सोबत संपर्कात रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.