Pimpri : शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील (Pimpri) एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार (दि. 26) रोजी पहाटे उघडकीस आली.
विशाल माने (वय 30) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोलीस कर्मचारी विशाल माने हे सन 2013 साली महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले होते. ते पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. गुरुवारी त्यांची साप्ताहिक सुट्टी होती. त्यामुळे ते गुरुवारी घरी होते. त्यांच्या पत्नी माहेरी गेल्या आहेत. दरम्यान त्यांनी रात्री राहत्या घरी गळफास घेतला.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले .मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. विशाल माने यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.