BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: राष्ट्रवादीने उमेदवार बदलला, माजी आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेसने काल जाहीर केलेली उमेदवारी आज अचानक बदलली आहे. संत तुकारामनगरच्या नगरसेविका सुलक्षणा धर यांना पक्षाने काल उमेदवारी जाहीर केली होती. आज त्यामध्ये बदल करत माजी आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी पक्षाच्या एबी फॉर्मसह आज निवडणूक निर्णय अधिका-यांकडे अर्ज सादर केला आहे.

राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी गुरुवारी जाहीर केली होती. त्यामध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी नगरसेविका सुलक्षणा धर यांना जाहीर झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले माजी आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ नाराज झाले होते.

दोघांनीही पत्रकार परिषद घेऊन बंडाचा इशारा दिला होता. अपक्ष लढणार असल्याचे बनसोडे यांनी जाहीर केले. माजी आमदार बंडखोरी करणार असल्याने पक्षातील घडामोडींना वेग आला. मोठी खलबते झाली. त्यामुळे रात्रीत उमेदवार बदलण्याचा निर्णय घेत बनसोडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3