Pimpri : मोशी-चिखलीतील गृहनिर्माण सोसाट्यांच्या समस्यांबाबत रविवारी परिसंवाद

चिखली मोशी हौंसिग सोसायटी फेडरशेनचा पुढाकार; आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची उपस्थितीती

एमपीसी न्यूज – चिखली-मोशी हौंसिग सोसायटी फेडरशेनच्या पुढाकाराने परिसरातील गृहनिर्माण सोसाट्यांच्या समस्यांबाबत येत्या रविवारी (दि. 21) परिसंवादाचे आयोजन केले आहे. या परिसंवादाला आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित राहणार आहेत. या परिसंवादातून जागेवरच समस्या सोडविल्या जाणार आहेत.

चिखली मोशी हौंसिग सोसायटी फेडरशेनतर्फे परिसंवादाचे आयोजन केले आहे. येत्या रविवारी (दि. 21)देहू-मोशी रोडवरील सिटी प्राईड स्कूल चिखली येथे या परिसंवादाचे आयोजन केले आहे. भोसरी, चिखली, मोशी, च-होली, दिघी परिसरातील गृहनिर्माण सोसाट्यांमधील समस्या, प्रलंबित प्रश्न, महापालिकेतर्फे केल्या जाणा-या विकास कामांबाबत या परिसंवादात चर्चा केली जाणार आहे.

  • गृहनिर्माण सोसायटीतील समस्या, प्रश्न प्रलंबित कामांची माहिती सोसायटीतील पदाधिका-यांनी निवेदनाद्वारे द्यावी. परिसंवादात सोसायटीतील एकाच पदाधिकाराने सहभागी व्हावे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी अनिकेत गायकवाड यांच्याशी 7720043861 आणि संजीवन सांगळे यांच्याशी 8975282377 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, चिखली मोशी हौंसिग सोसायटी फेडरशेनतर्फे रविवारी चिखली, मोशी, जाधववाडी, डुडुळगाव परिसरातील गृहनिर्माण सोसाट्यांमधील समस्या जाणून घेण्यासाठी परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाला सोसाट्यांच्या विविध समस्यांशी निगडीत असलेल्या महापालिकेच्या सर्व विभागातील प्रमुखांनी चर्चासत्रासाठी उपस्थित रहावे. त्यांना तसे निर्देश द्यावेत, अशी मागणी फेडरेशनने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. फेडरेशनचे अध्यक्ष विकास साने, विजय आवटे, संजीवन सांगळे यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like