Pimpri : सुपर इलेव्हन, इनकम टॅक्स् संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्टस्, सोशल अँड कल्चरल अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धा

एमपीसी न्यूज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्टस्, सोशल अँड कल्चरल अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत सुपर इलेव्हन आणि इनकम टॅक्स् संघ, पुणे या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरू नगर-पिंपरी येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत सुपर इलेव्हन संघाने बॉम्बे इंजीनिअर्स गु्रप, खडकी संघाचा पेनल्टी शुट आऊट मध्ये ६-४ असा पराभव केला. पूर्णवेळ २-२ अशी बरोबरी झाली . सामन्यात पेनल्टी शुट आऊट पध्दतीचा अवलंब करण्यात आला. सुपर इलेव्हन संघाकडून आकाश सपकाळ याने दोन गोल केले. पेनल्टी शुट आऊटमध्ये अमोल भोसले, उदय बारामीतीकर, ओंकार मुसळे आणि आकाश सपकाळ यांनी गोल करून संघाला विजय मिळवून दिला.

  • इनकम टॅक्स्, पुणे संघाने प्रभाकर अस्पत अ‍ॅकॅडमी संघाचा ८-० असा धुव उडवित स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. विजयी संघाकडून सोनु दलाल याने दोन तर, आशुतेष जिग्नेश, नितीन कुमार, अजितेश रॉय, अभिषेक, अर्थव कांबळे आणि संतोष कस्तुरे यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.

उप-उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात ग्रीन मेडोज् संघाने प्रियदर्शिनी स्पोर्टस् सेंटर, खडकी संघाचा ४-० असा पराभव करून आगकूच केली. ग्रीन मेडोज संघाकडून स्टेफन स्वामी, सचिन बडवे, गौरव कांबळे व दत्ता शिंदे यांनी गोल केले.

  • स्पर्धेत आज (गुरूवार) विश्रांतीचा दिवस असून शुक्रवारी सामने होणार आहेत.

स्पर्धेचा सविस्तर निकालः उपांत्यपुर्व फेरी :
सुपर इलेव्हन : २, ४ (आकाश सपकाळ २६, ३१ मि., अमोल भोसले, उदय बारामीतीकर, ओंकार मुसळे, आकाश सपकाळ) वि.वि. बॉम्बे इंजीनिअर्स गु्रप, खडकीः २, २ (बसंत तिर्के १० मि., ऋषभ साहु ३३ मि., अविनाश कुमार, अजित शिंदे); हाफ टाईमः ०-१;

इनकम टॅक्स्, पुणे :८ (आशुतेष जिग्नेश १ मि., सोनु दलाल ४, ४५ मि., नितीन कुमार ८ मि., अजितेश रॉय १२ मि., अभिषेक १६ मि., अर्थव कांबळे ५० मि., संतोष कस्तुरे ५८ मि.) वि.वि. प्रभाकर अस्पत अ‍ॅकॅडमीः ०; हाफ टाईमः १-०;

उप-उपांत्यपुर्व फेरी : ग्रीन मेडोज्ः ४ (स्टेफन स्वामी २१ मि., सचिन बडवे ४३ मि., गौरव कांबळे ५० मि., दत्ता शिंदे ५२ मि.) वि.वि. प्रियदर्शिनी स्पोर्टस् सेंटर, खडकीः ०.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.