Pimpri : नसबंदीसाठी आणलेल्या श्‍वानच्या मृत्यूप्रकरणी पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – नसबंदीसाठी आणलेल्या श्‍वानाकडे व्यवस्थित लक्ष न दिल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठेकेदाराचा पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना टेल्को रोड जवळील केंद्रात घडली.

ऍन्सन ऍन्यनी पालकर (वय 33, रा. नांदे रोड, म्हाळुंगे, पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सीपीसीए कंपनीचे पर्यवेक्षक बापू पाटील (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 सप्टेंबर ते 16 ऑक्‍टोबर या कालावधीत आरोपी पाटील यांनी टेल्को रोडवरील अनुकूल कंपनी जवळील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या श्‍वान नसबंदी केंद्रात आणलेल्या श्‍वासनावर व्यवस्थित लक्ष ठेवले नाही. यामुळे एका श्‍वानाचा जाळीत अडकून मृत्यू झाला. त्यांच्या देखरेखीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पाटील याच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. टी. शेडगे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.