Pimpri: जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा नियमित, नागरिकांनो घाबरु नका, गर्दी करु नका – नामदेव ढाके

0

 एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देशात 21 दिवसापर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे.  या दरम्यान अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा नियमितपणे होणार आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासन त्यासाठी आवश्यक उपाययोजना करत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये, खरेदीसाठी गर्दी करु नये असे आवाहन महापालिकेचे सभागृह नेते नामदेव ढाके यांनी केले आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा  122 वर पोहचला आहे.  आजपासून देशभरात पुढील 21 दिवसांसाठी लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे शहरातील दुकाने व अस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. जीवनावशक वस्तू यापुढे देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे त्याचा अनावश्यक साठा करु नये असे आवाहनही ढाके यांनी केले.

नागरिकांनी घरी, कामाच्या ठिकाणी अथवा वाहनामधील वातानुकुलीत यंत्रणेचा वापर टाळावा. पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. होम क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या नागरिकांनी आपल्या कुंटुंबीयासह आपल्या शरीराच्या तापमानाची तपासणी घरातच करावी. त्याची नोंद ठेवावी. महापालिकेच्या तपासणी पथकाला माहिती देवून आवश्यक सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

घरातील अलगीकरणात असणा-या नागरिकांनी बाहेर पडू नये. अशी व्यक्ती बाहेर पडल्याचे आढळल्यास त्याची माहिती महापालिकेच्या सारथी हेल्पलाईन 8888006666 यावर कळवावी असे आवाहनही सभागृह नेते नामदेव ढाके यांनी केले आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like