Pimpri : अंतराळासंबधात कायदा करणे गरजेचे- सुरेश नाईक

डी. वाय. पाटील विधी महाविद्यालयात मार्गदर्शन

एमपीसी न्यूज- अंतराळसंबंधात भारताचे प्रभुत्व कायम राखण्यासाठी आणि या संबंधीच्या सर्व प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी कायदा करणे अत्यावश्यक आहे, असे मत इस्त्रोचे माजी संचालक डॉ. सुरेश नाईक यांनी व्यक्त केले.

डॉ. डी. वाय. पाटील युनीटेक सोसायटीचे डॉ. डी. वाय. पाटील विधी महाविद्यालय व विधी विभाग सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एक्सपांडिंग हॉरीझॉन्स आॅफ एअर अ‍ॅण्ड स्पेस लॉ या विषयावर राष्ट्रीय एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी नाईक बोलत होते.

या चर्चासत्रामध्ये इस्त्रोचे माजी संचालक डॉ. प्रमोद काळे , हैद्राबाद येथील नालसार युनिर्व्हसीटी आॅफ लॉ चे अधिष्ठाता डॉ. बालकिस्ता रेड्डी बेंगलोर येथील एअर लॉ चे अभ्यासक डॉ. सी. एच.बॅनर्जी , डॉ. दिप्ती देबागकर उपस्थित होत्या. या चर्चासत्रामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यामधून प्राध्यापक सहभागी झाले होते.

डॉ. डी. वाय.पाटील महाविद्यालाच्या प्राचार्या डॉ. उज्वला शिंदे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विधी विभाग प्रमुख डॉ. डी.ए. पटेल यांनी यावेळी मार्गदर्शन केले. डॉ. पद्मजा काठीकर व डॉ. ज्योती भाकरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता डॉ. डी. वाय. पाटील युनीटेक सोसायटीचे चेअरमन डॉ. पी. डी.पाटील, सचिव सोमनाथ पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.