Pimpri: ‘आरपीआय’च्या शहराध्यक्षपदी सुरेश निकाळजे; रामदास आठवले यांनी केले शिक्कामोर्तब

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) शहराध्यक्षपदी सुरेश निकाळजे यांच्या नियुक्तीवर आरपीआयचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, निकाळजे यांच्या निवडीला एका गटाने आक्षेप घेतला होता.

पक्षाचे सचिव बाळासाहेब भागवत यांनी शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन यांच्या जागी सुरेश निकाळजे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यांना नियुक्तीचे पत्र देखील दिले. पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार निकाळजे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. परंतु, त्याला दुस-या सचिव चंद्रकांता सोनकांबळे यांनी आक्षेप घेतला होता.

बाळासाहेब भागवत यांना नवीन शहराध्यक्ष नियुक्त करण्याचा अधिकार नाही. ते तिसऱ्या क्रमांकाचे सचिव आहेत. मी देखील सचिव आहे. सुरेश निकाळजे यांना सर्वांचा विरोध आहे. त्यांनी परस्पर नियुक्ती केली आहे, असेही त्यांनी म्हटले होते.

पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले आजच पिंपरीच्या दौ-यावर होते. त्यांनी सुरेश निकाळजे यांच्या शहराध्यक्षपदाच्या नियुक्तीला संमती दर्शविली. त्यांची निवड वैध ठरविण्यात आली, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.