Pimpri: दिवसभरात 26 हजार नागरिकांचे सर्वेक्षण, 1940 होम क्वारंटाईन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील कन्टेंनमेंट झोन मधील 26 हजार 917 नागरिकांचे आज (शनिवारी) सर्वेक्षण केले आहे. तर, परदेशातून शहरात आलेल्या 1940 व्यक्तींना घरातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत 757 व्यक्तींचे कोरोना तपासणीसाठी घशातील द्रावाचे नमुने एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी आज अखेर 703 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. तसेच आज (शनिवारी) 56 संशयितांचे नमुने एनआयव्ही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

आजचा अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 56

#पॉझिटीव्ह रुग्ण – 00

#निगेटीव्ह रुग्ण – 80

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 28

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 42

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 80

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 29

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 17

#क्रिटीकल रुग्ण –  1

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 12

# दैनंदिन भेट दिलेल्या घरे – 9059

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 26917

# आजपर्यंतची होम क्वारंटाईन नागरिकांची संख्या – 1940

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.