Pimpri : बेघर झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी रेल्वे स्थानकाच्या फलाटाचे रुंदीकरण करताना लोहमार्गालगतच्या नागरिकांच्या झोपड्या पाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सर्व नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, त्यांचे अन्यत्र ठिकाणी पुनवर्सन करावे, अशी मागणी सुवर्ण ज्योत महिला उन्नती व उद्योग प्रशिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना निवेदन देण्यात आले आहे. या शिष्टमंडळात सुवर्ण ज्योत महिला उन्नती व उद्योग प्रशिक्षण संस्था अध्यक्षा जया संजय पाटील, आंबेडकर राईट ऑफ इंडियाचे राहुल कांबळे, संजय पाटील, अनिता रिडलान, सारिका शिंदे यांचा समावेश होता.

पिंपरी रेल्वे स्थानकाच्या फलाटाची लांबी वाढविण्यात येत आहे. त्याकरिता लोहमार्गालगतच्या झोपड्या पंधरा दिवसांपूर्वी हटविण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यांच्या पुनर्वसनाची मागणी केली जात आहे. सुवर्ण ज्योत महिला उन्नती व उद्योग प्रशिक्षण संस्थेच्या शिष्टमंडळाने देखील उपजिल्हाधिका-यांची भेट घेऊन नागरिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.