Pimpri: ‘स्वच्छ’ अंतर्गत 14,756 शौचालयांची उभारणी

एमपीसी न्यूज – केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मंजूर झालेल्या अर्जांपैकी 14 हजार 756 शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

या अभियानांतर्गत शहरातील ज्या कुटुंबाकडे स्वतःचे स्वतंत्र शौचालय नाही त्यांच्यासाठी निधी देत शहर हागणदारी मुक्त करणे हा या अभियानाचा मुळ उद्देश आहे. या निधीसाठी महापालिकेकडे 17 हजार 322 अर्ज आले होते. त्यापैकी 14 हजार 756 अर्ज मंजूर करण्यात आले. या शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या अनुदानातून केंद्राचे चार हजार, राज्याचे आठ हजार व महापालिकेचा हिस्सा म्हणून चार हजार असे 16 हजार रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना दिले जात आहे.

केंद्र शासनाकडून 4 कोटी 93 लाख 14 हजार 961 तर राज्य शासनाकडून 9 कोटी 10 लाख 54 हजार 974 रुपये असा 14 कोटी 3 लाख 69 हजार 935 रुपयांचे अनुदान महापालिकेला प्राप्त झाले आहे. त्यापैकी पहिल्या दोन टप्प्यात आठ कोटींच्या निधीचे वितरण शौचालय उभारणीसाठी करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like