Pimpri: शालेय राष्ट्रीय योगासन स्पर्धेत स्वरदा देशपांडेला रजत पदक

एमपीसी न्यूज – दिल्ली येथे पार पडलेल्या 64 व्या शालेय राष्ट्रीय योगासन स्पर्धेत फत्तेचंद हायस्कूलच्या स्वरदा देशपांडे हिने रजत पदक मिळविले.

ही स्पर्धा 3 ते 9 जानेवारी या कालावधीत दिल्लीतील त्यागराज स्टेडियम येथे घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये भारतातील 30 राज्यातील 420 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धा 19 वर्षाखालील मुले आणि मुली यांच्यामध्ये घेण्यात आली. स्वरदा ही पुणे डिस्ट्रिक्ट योगा ऍण्ड फिटनेस इन्स्टिट्यूट ज्ञानप्रबोधिनी येथे इंडियन टीमचे प्रशिक्षक आणि कर्णधार चंद्रकांत पांगारे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली आठ वर्षे सराव करीत आहे. महाराष्ट्रातील योग पटूणी एकूण 15 पदके मिळवली तर सर्वसाधारण विजेतेपद दिल्ली संघाने मिळवले.

स्वरदा हिने सलग पाचव्या वर्षी शालेय राष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये पदक मिळवल्याबद्दल संस्थेच्या वतीने ज्ञानप्रबोधिनीचे केंद्र प्रमुख मनोज देवळेकर यांनी तिचे अभिनंदन केले. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी फत्तेचंद हायस्कूलचे मुख्याध्यापक कलंत्री सर, क्रीडाशिक्षक मदने सर, शिंदे मॅडम व वर्गशिक्षक बोथे मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले, अशी माहिती संस्थेचे सहसचिव रुपाली तरवडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.