Pimpri: स्मार्ट सिटीसाठी स्वीडनचे सहकार्य

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीमध्ये स्वीडनकडून सहकार्य करण्यात येणार असल्याचे स्वीडनच्या भारतातील कॉन्सुलेट जनरल श्रीमती उर्लिका संडबर्ग यांनी सांगितले.

स्वीडनच्या पथकाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची गुरुवारी (दि.21) भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. महापालिका भवनात आलेल्या या शिष्टमंडळाचे आयुक्त हर्डीकर यांनी स्वागत केले. स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, सह शहर अभियंता मकरंद निकम, श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, स्वीडनच्या शिष्टमंडळातील लीव डलबर्ग, न सॉफी, डेवीस, विली सिबीया, क्‍लास वाहलबर्ग, जेनिफर क्‍लार्क, जोहान हेमिंगसन, रूपाली देशमुख आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहर विकसित करण्यात येणार असल्याचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी यावेळी सांगितले. शहराच्या चिरंतन व चिरस्थायी विकासासाठी महानगरपालिका प्रयत्न करत आहे. त्यासाठी स्वीडनने सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.याशिवाय केंद्र सरकारने स्मार्ट सिटीमध्ये पिंपरी चिंचवडचा समावेश केला असून येत्या दोन वर्षांत त्याचे काम दृष्टीपथात येईल, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.