BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : आषाढीनिमित्त रताळी बाजारात दाखल; सोलापुरातून गावरान रताळयांची अधिक आवक

एमपीसी न्यूज – शुक्रवारी (दि. १२) आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्त पिंपरीतील लाल बहादूर शास्त्री मंडईत रताळयांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रताळी आणि भुईमूगाच्या शेगांनाही मागणी वाढली आहे. ‘लाल रंगाच्या मात्र, आकाराने लहान असलेल्या रताळ्यांना चांगली मागणी आहे.

पिंपरीतील लाल बहाद्दर शास्त्री मार्केटमध्ये बेळगाव आणि गावरान रताळांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. येथील लालबहादूर शास्त्री मार्केटमध्ये गावरान आणि बेळगाव रताळास प्रती किलोस अनुक्रमे 25 ते 35 आणि 15 ते 20 रुपये भाव मिळाल्याची माहिती पिंपरीतील लाल बहादूर शास्त्री मंडईतील विक्रेत्यांनी दिली आहे.

  • सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यातील उंदरगाव आणि मांजरगाव येथून गावरान रताळ्याची आवक झाली आहे. उपवासाच्या पदार्थांमध्ये आवडीने खाल्ले जाणारे रताळे बाजारात दाखल झाले आहे. चवीला काहिसे गोड असलेल्या रताळ्यांना उपवासाच्या पदार्थांमध्ये स्थान असल्यामुळे त्यास मोठी मागणी आहे.

HB_POST_END_FTR-A2

.