Pimpri : वातावरणात बदल, स्वाइन फ्ल्यू सदृश्‍य तीन रुग्ण आढळले

एमपीसी न्यूज- गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हवामानात बदल होत आहे. या वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्लूने पुन्हा एकदा डोके काढल्याची चिन्हे आहेत. शहरात बुधवारी (दि. 28) तीन स्वाइन फ्ल्यू सदृश्‍य रुग्ण आढळले आहेत.

वातावरणातील बदलामुळे पिंपरी-चिंचवड शहरात थंडी-तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये आतापर्यंत 4 हजार 578 तापाचे रूग्ण सापडले आहेत. त्यापैकी 86 जणांच्या घशातील द्रव पदार्थ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला. यापैकी 19 जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

34 जणांना टॅमी फ्ल्यूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. आज पुन्हा तीन स्वाईन फ्ल्यू सदृश्‍य रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या तापमानामध्ये चढ-उतार जाणवत आहे. तापमानातील तफावत यामुळे स्वाइन फ्लू पुन्हा सक्रिय होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.