Pimpri : उन्हाळ्यात बच्चे कंपनीची धाव जलतरण तलावाकडे

एमपीसी न्यूज – तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पालिकेच्या चिंचवड येथील गावडे जलतरण तलावावर पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सुट्यांमुळे बच्चे कंपनीचीही पोहण्यासाठी गर्दी उसळल्याने येथील जलतरण तलाव फुल्ल झाला आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहायला शिकवण्यासाठी पूर्वी नदी, विहीरी, तलावावर गर्दी व्हायची. मात्र नंतरच्या काळात जलतरण तलाव विकसित झाले. पिंपरी-चिंचवड शहरात 12 जलतरण तलाव आहे.शहरात उन्हाच्या झळा जशा वाढू लागल्या तरी जलतरण तलावावरील गर्दी वाढू लागली आहे. सुटी लागताच अंगाची लाहीलाही करणा-या उन्हाळ्यात आबालवृध्दांची पावले जलत रण तलावाकडे वळत आहे.गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे. उन्हाच्या काहिलीपासून सुटका मिळावी यासाठी जलतरण तलावावर पोहण्यास दरवर्षी नागरिकांची गर्दी होते.

गेल्या दोन आठवड्यांपासून तापमानात मोठी वाढ झाल्याने पिंपरी-चिंचवड येथील पालिकेच्या गावडे तलावावर पोहण्यासाठी नागरिकांची रीघ लागली आहे. बच्चे कंपनीचीही पोहण्यासाठी सकाळच्या वेळी झुंबड उडू लागली आहे. या जलतरण तलावावरील पोहण्याच्या सर्व बॅचेस फुल्ल झाल्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहायला शिकण्यासह मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी शहरातील पाच जलतरण तलावावर तुडुंब गर्दी होऊ लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.