Pimpri: महापौरांसाठी 74 हजार रुपयांचा ‘टॅब’

खर्चाला स्थायी समितीची कार्योत्तर मान्यता 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव यांना स्वत:च्या वापरासाठी महापालिका खर्चातून ‘टॅब’ देण्यात आला आहे. त्यासाठी तब्बल 74 हजार रुपये खर्चाला आज (मंगळवारी) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत कार्योत्तर मान्यता देण्यात आली. 

पिंपरी महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भाजपने काटकर सुरु केली. सत्कार सोहळ्याला पुष्पगुच्छ, पुष्पहार देणे बंद केले. महापालिकेची रोजनिशी (डायरी) छापणे बंद करण्यात आले. तसेच महापालिकेच्या विविध कार्यक्रम, उद्‌घाटनांची रंगीत पत्रिका छापण्याचे देखील बंद करण्याचा निर्णय घेतला. स्मृतिचिन्ह खरेदी बंद केली. मैदान व पटांगणात कार्यक्रम न घेता पालिकेच्या नाट्यगृह किंवा सभागृहातच कार्यक्रम घेणे. अशा विविध माध्यमातून पालिकेची आर्थिक बचत केली जात असल्याचे सांगितले. त्याची प्रसिद्धी देखील मिळविली; मात्र दुसरीकडे महागडे टॅब खरेदी करुन जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचे समोर आले आहे.

सभा कामकाज, शहरातील समस्या, नागरिकांची विविध कामे तसेच कार्यालयीन कामकाज सुलभतेने करण्यासाठी महापौर राहुल जाधव यांनी अॅपल या उत्पादीत कंपनीचा टॅब खरेदी केला आहे. युनिवॅक्स मार्केटींग यांच्याकडून 74 हजार रुपयाला हा ‘अॅप’ खरेदी केला आहे. त्या खर्चाला आज (मंगळवारी) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत कार्योत्तर मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.