_MPC_DIR_MPU_III

Pimpri: भाजप नगरसेवक मारहाण प्रकरणातील दोषींवर कारवाई करा; आमदार लांडगे, जगताप यांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

Take action against BJP corporator assault case; Statement of MLA Landage, Jagtap to the Commissioner of Police

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे नगरसेवक विलास मडिगेरी यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांनी पोलिसांकडे केली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

याबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांना निवेदन देण्यात आले आहेत. त्यात म्हटले आहे की, नगरसेवक मडिगेरी यांना सोमवारी (दि. 1) सायंकाळी महापालिकेत जबर मारहाण करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

शिवसेना गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे व पंकज भालेकर या तिघांनी मिळून मडिगेरी यांना ही मारहाण केली. त्याबाबत स्वतः मडिगेरी यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना जबाब दिलेला आहे. त्यांना कोणी आणि का मारहाण केली हे पोलिसांसमोर स्पष्ट केले आहे.

या घटनेला चार दिवस उलटले आहेत. तरी देखील कारवाई झाली नाही. त्यामुळे दोषींवर दोन दिवसात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदारांनी निवेदनातून केली आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.