Pimpri : बोगस खते, बी बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करा – गजानन बाबर

Take action against companies selling fake fertilizers, seeds - Gajanan Babar : कृषिमंत्र्यांना कारवाईसाठी साकडे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील बऱ्याच भागात खते व बियाणे यांची बोगस विक्री सुरू आहे. हा गंभीर प्रकार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानासह याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने याची दखल घेऊन बोगस खते व बियाणे यांची विक्री करणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

याबाबत बाबर यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांना निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, काही कंपन्या सेल्फ सर्टिफीकेशन करून खते व बियाणे विक्री करत आहेत. अशा कंपन्यांवर सरकारने कारवाई करुन या कंपनीना काळ्या यादीत टाकावे.

शेतकऱ्यांनी अशा बोगस कंपनीकडून विकत घेतलेले बियाणे खराब निघाल्यास त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते तसेच पेरणीची वेळ निघून गेल्यानंतर हातातील हंगाम सुटतो.

त्यामुळे सरकारने कठोर पाऊले उचलून अशा बोगस कंपनी आणि त्यांची खते, बी बियाणे प्रमाणीत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी बाबर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.