Pimpri: विनापरवाना गैरहजर अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई करा

आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे विभागप्रमुखांना आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विनापरवाना गैरहजर राहणा-या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाईचा बडगा उगरण्यात येणार आहे. दांडीबहाद्दर अधिका-यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विभागप्रमुखांना दिले आहेत. तसेच कारवाईत कसूर केल्यास विभागप्रमुखांवरच शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत पूर्णवेळ उपस्थित राहून नेमून दिलेले कामकाज वेळेत पूर्ण करणे, हे त्यांची जिम्मेदारी आहे. मात्र, बहुतांश विभागातील अधिकारी, कर्मचारी विनापरवाना दिर्घकाळ गैरहजर असतात. तरीही, त्यांच्याविरूद्ध कोणतीही कारवाई केली जात नाही.

  • तसेच अधिकार प्रदानानुसार विभागप्रमुख देखील यथोचित कारवाई करत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कार्यरत कर्मचा-यांचे मनोधर्य, सचोटी व कर्तव्यतत्परता यावर विपरीत परिणाम होत आहे. कार्यालयीन शिस्त रहात नाही. अशा अधिकारी, कर्मचा-यांवर विभागस्तरावर शिस्तभंगाची कारवाई होणे. अभिप्रेत असताना तसे होत नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विभागप्रमुखांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

ज्या विभागातील अधिकारी किंवा कर्मचारी एक महिना अथवा त्यापेक्षा अधिक कालावधी विनापरवाना गैरहजर राहतील. त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात यावी. तर, एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधी विनापरवाना गैरहजर राहणा-यांना कारणे दाखवा नोटीस देवून, त्याचा खुलासा मागवून घ्यावा. त्यानुसार त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचा प्रस्ताव प्रशासन विभागाकडे द्यावा, असे आदेश आयुक्त हर्डीकर यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.

  • ही कार्यवाही त्यांनी येत्या 10 जुलैपर्यंत पूर्ण करायची आहे. त्यानंतर विनापरवाना गैरहजर राहणा-या अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई न करणा-या विभागप्रमुखांवर शिस्तभंगाची करवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त हर्डीकर यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.