Pimpri: अनधिकृत फलकांवर कारवाई करा -राहुल जाधव

एमपीसी न्यूज – शहरातील राडारोडा उचलणे, अतिक्रमणे हटविणे, अनाधिकृत फलेक्स बॅनर्स काढून टाकणे, नदीतील जलपर्णी काढून टाकून नदी स्वच्छ ठेवणे, मोकाट जनावरे, कुत्री आणि डुकरे यांचा नारिकांना त्रास होणार नाही, याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिका-यांना दिल्या आहेत.

प्रभाग स्तरावरील अडचणी आणि विकास कामांबाबतच्या आढावा बैठकांचे आयोजन सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये त्यांनी केले असून आज ‘ह’ प्रभागाची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते.

  • यावेळी प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्य राजू बनसोडे, रोहित काटे, संतोष कांबळे, नगरसदस्या स्वाती काटे, माधवी राजापुरे, सीमा चगुले, उषा ढोरे, स्वीकृत सदस्य ज्ञानेश्वर थोरात, नामनिर्देशित सदस्य कुणाल लांडगे, सहाय्यक आयुक्त आशा राऊत, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, प्रदिप पुजारी, केशवकुमार फुटाणे, संजय खाबडे, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपिक रमेश भोसले तसेच सर्व विभागांचे संबधीत अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी महापौर जाधव यांनी ‘ह’ प्रभागातील सर्व भागांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत करणे. प्रभागातील राडारोडा उचलणे, अतिक्रमणे हटविणे, अनाधिकृत फलेक्स बॅनर्स काढून टाकणे, नदीतील जलपर्णी काढून टाकून नदी स्वच्छ ठेवणे, मोकाट जनावरे, कुत्री व डुकरे यांचा नारिकांना त्रास होणार नाही, यांकडे प्राधान्याने लक्ष दणे. झोपडपट्टयांमधील ड्रेनेज साफ करून त्यातील गाळ काढून टाकणे. झोपडपट्टयामध्ये पावसाचे पाणी साचणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like