Pimpri: हिवतापापासून दूर राहण्यासाठी ‘ही’ घ्या काळजी; पालिकेचे आवाहन

Take care of 'this' to stay away from malaria; Appeal of the municipality पाण्याची साठवण करणे, घराभोवतीच्या परिसरात साचलेले सांडपाणी डासांच्या वाढीस उपयुक्त असते.

एमपीसी न्यूज – पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे  हिवताप, डेंगू व चिकनगुनिया या किटकजन्य रोगांच्या साथी उद्भवू नये, म्हणून काळजी घेण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी  केले आहे.

पाण्याची साठवण करणे, घराभोवतीच्या परिसरात साचलेले सांडपाणी डासांच्या वाढीस उपयुक्त असते. या पाण्यात अळ्या वाढतात, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. म्हणून डासांची उत्पत्ती होऊन नागरिक आजारी पडतात.

हिवताप, डेंगू किंवा चिकनगुनिया झालेल्या व्यक्तीस डास चावला, तर रोग्याच्या रक्तातील हिवताप, डेंगू , चिकनगुनियाचे विषाणू त्या डासांच्या शरीरात असा डास निरोगी व्यक्तीलाही आजारी करतो. त्यामुळे शहरात पावसाळ्यात हिवताप, डेंगू , चिकनगुनियासारखे रोग पसरू नयेत म्हणून वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.

यासाठी डासोत्पत्ती स्थानावरील नियंत्रणाची माहिती नागरिकांपर्यंत पोचवून सामाजिक प्रबोधन व जनजागरण करणे आवश्‍यक असल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने जनजागृती सुरू केली आहे.

‘ही’ घ्या काळजी

  • घरात पाणी साठविण्याची सर्व भांड्यातील पाणी वापरून रिकामी करून कोरडी करा.
  • घरातील मोठ्या टाक्‍या, ज्या रिकाम्या करता येणे शक्‍य नाहीत, त्यांना घट्ट झाकण बसवायचे आहे.
  • घरातील फ्लॉवर पॉट, कुलर व फ्रिजचा खालचा ट्रेमधील पाणी दर आठवड्यास रिकामे करावयाचे आहे.
  • घराच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या भंगार मालाची विल्हेवाट लावायची आहे.
  • घराभोवती पाण्याची डबकी असतील, तर ती बुजविणे किंवा त्याठिकाणी पाणी वाहते करा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.