Pimpri : अनधिकृत होर्डिंगबाबत फौजदारी कारवाई करा

एमपीसी न्यूज : – पिंपरी-चिंचवड शहरातील अधिकृत आणि अनधिकृत सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट पुन्हा एकदा करावे. तसेच, त्यांचे सर्वेक्षण करून अनधिकृत होर्डिंगमालकांकडून त्यांनी बेकायदा कमावलेले सर्व पैसे वसूल करावेत, अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे पिंपरी-चिंचवड शहर वरिष्ठ उपाध्यक्ष भारत  मिरपगारे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह केली आहे.

रिपब्लिकन युवा मोर्चाचे पिंपरी-चिंचवड शहर वरिष्ठ उपाध्यक्ष भारत  मिरपगारे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, यापुढील काळात शहरात होर्डिंग पडण्याची घटना घडल्यास जागामालक, होर्डिंग मालक, क्षेत्रीय अधिकारी, स्ट्रक्चरल ऑडिट करणारे अधिकारी, कर्मचारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी. तसेच, त्यांच्याकडून नुकसान भरपाई करून घ्यावी. मुंबईतील घाटकोपर येथे अनधिकृत होर्डिंग कोसळून 16 नागरिकांचे बळी गेले. तर, गुरुवारी (दि. 16) मोशी येथील गणेश साम्राज्य चौकात 20 बाय 40 फूट आकाराचे होर्डिंग पत्राशेड, टेम्पो आणि दोन दुचाकीवर कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी(Pimpri) झाली नाही.

महापालिका प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणातून सुमारे 400 पेक्षा अधिक अनधिकृत होर्डिंग आहेत हे निष्पन्न झाले. या 400 अनधिकृत होर्डिंगपैकी प्रशासनाने पाच पट तडजोड फी आकारुन सुमारे 200 अनधिकृत होर्डिंग अधिकृत केले. यातून महापालिका प्रशासनाला सुमारे 21 कोटी रुपये महसूल मिळाला. पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे 400 पेक्षा अधिक अनधिकृत होर्डिंग होते. ते वर्षानुवर्ष त्यावर कोट्यावधी रुपये कमवत होते, मात्र त्यांच्याकडून त्यांनी बेकायदेशीर मिळवलेला पैसा वसूल करण्यात आलेला नाही. तसेच हे होर्डिंगमालक परवानगीसाठी प्रशासनाला अर्ज देतात, होर्डिंग लावतात, त्यावर पैसे कमवतात आणि मग काही महिन्याचे नगण्य पैसे भरतात. हा सर्व कारभार आपल्या प्रशासनाच्या व होर्डिंग माफियांच्या संगनमताने(Pimpri) होतो. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार होतो.

Pune: पुणे महानगरपालिकेची निवडणूक घेण्याबाबत राज्य सरकार गंभीर

पिंपरी-चिंचवड शहरातील अधिकृत आणि अनधिकृत सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट पुन्हा एकदा व्हावे, सर्वेक्षण व्हावे, अनधिकृत होर्डिंग मालकांकडून त्यांनी बेकायदेशीर कमावलेले सर्व पैसे वसूल करावेत. यापुढे शहरात अशी घटना घडली तर जागामालक, होर्डिंग मालक, क्षेत्रीय अधिकारी, स्ट्रक्चरल ऑडिट करणारे अधिकारी कर्मचारी यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर देखील फौजदारी कारवाई करुन त्यांच्याकडून झालेल्या नुकसानीची भरपाई करुन घ्यावी असे रिपब्लिकन युवा मोर्चाचे पिंपरी-चिंचवड शहर वरिष्ठ उपाध्यक्ष भारत  मिरपगारे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share