Pimpri : टाटा मोटर्सच्या नवीन अल्ट्रॉझ गाडीचे रोलआउट

नवीन वर्षात होणार बाजारात दाखल

एमपीसी न्यूज- टाटा मोटर्स कंपनीकडून आगामी नवीन वर्षात तीन नवीन वाहने बाजारात दाखल होणार आहेत. सहा आसनी टाटा ग्रॅव्हिटाज एसयुव्ही, टाटा नेक्सन इव्ही व टाटा अल्ट्रॉझ ही तीन वाहने पुढील वर्षी बाजारपेठेत दाखल होणार आहेत. त्यापैकी टाटा अल्ट्रॉझ प्रीमियम या पहिल्या गाडीचे उत्पादन सुरु करण्यात आले असून पहिल्या गाडीचे रोलआऊट बुधवारी (दि. 27) टाटा मोटर्सच्या पुणे प्रकल्पात करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

टाटा अल्ट्रॉझ ही गाडी तीन प्रकारच्या इंजिन मध्ये उत्पादित करण्यात येणार आहे. एक 85 एचपी 1.2 लिटर, थ्री सिलेंडर, दुसरी 102 एचपी, 1.2 लिटर थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिन व तिसरी 90 एचपी, 1.2 लिटर फोर सिलिंडर डिझेल इंजिन अशा तीन प्रकारात ही गाडी उपलब्ध असणार आहे. सुरुवातीच्या काळात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स राहणार असून त्यानंतर ऑटोमॅटिक गिअर बॉक्स ठेवण्याचे नियोजन आहे.

नवी टाटा अल्ट्रॉझची एक्क्स शोरूम किंमत 5 ते 8 लाख असणार असून प्रतिस्पर्धी असलेल्या ह्युंदाई आय 20, मारुती सुझुकी बॅलेनो, टोयोटा ग्लॅन्झ आणि होंडा जॅझ या गाडयांना स्पर्धा देईल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.