Pimpri: ‘फ्लीट एज’ सुयोग्य ताफा व्यवस्थापनासाठी टाटा मोटर्सचे डिजिटल सोल्युशन

Pimpri: Tata Motors Digital Solution for 'Fleet Edge' Tafa Management वाहने आता टेलिमॅटिक्स युनिट्सद्वारे पाठवू शकत असलेल्या समृद्ध डेटाने संपूर्ण लॉजिस्टिक साखळीसाठी अनेक नव्या शक्यतांची द्वारे खुली झाली आहेत.

एमपीसी न्यूज- मालाची डिलिव्हरी, इंधन कार्यक्षमतेवर देखरेख, वाहनाची स्थिती व ड्रायव्हिंग वर्तनाचे ट्रॅकिंग करणे तसेच वाहनाच्या कागदपत्र नूतनीकरणाबाबत महत्त्वाच्या तारखांचीही नोंद ठेवण्यास सक्षम असलेल्या ‘फ्लीट एज’ या डिजिटल पर्यायाची निर्मिती टाटा मोटर्सने केली आहे.

टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने टाटा मोटर्स फ्लीट एज या भविष्यकाळासाठी सज्ज कनेक्टेड वाहन सोल्युशनच्या लाँचिंगची घोषणा केली.

हे सोल्युशन माहितीपूर्ण निर्णयांच्या माध्यमातून वाहनांच्या ताफ्याचे व्यवस्थापन करण्यात मदत करते. वाहनांमधील टेलिमॅटिक्स सोल्युशन्सच्या बाबतीत टाटा मोटर्स वर्ष 2012 पासून आघाडीवर आहे.

आज टाटा मोटर्सच्या दोन लाखाहून अधिक एम अँड एचसीव्ही वाहनांमध्ये कारखान्यातच टेलिमॅटिक्स युनिट बसवलेली आहेत. टाटा मोटर्स फ्लीट एज आणून वाहनांतील कनेक्टेड सोल्युशन्स पुढील स्तरावर घेऊन जात आहे.

टेलिमॅटिक्स कंट्रोल युनिटद्वारे (टीसीयू) निर्माण केला जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्याची क्षमता फ्लीट एजमध्ये आहे. तसेच वाहनाचा माग ठेवणे व ते शोधणे, वाहनाची स्थिती, ड्रायव्हिंग वर्तन, रिअल-टाइम इंधन कार्यक्षमता व इंधनातील गळतीचा इशारा यांबाबत तात्काळ माहिती हे सोल्युशन पुरवते.

ग्राहकांना याद्वारे वाहनाच्या महत्त्वपूर्ण दस्ताएवेजांसंदर्भातील मुदतीच्या तारखाही ट्रॅक करणे यामुळे शक्य होणार आहे.

ग्राहकांना ही माहिती टाटा मोटर्स फ्लीट एज पोर्टलवरील एका यूजर-फ्रेण्डली इंटरफेसच्या माध्यमातून उपलब्ध होईल आणि त्यांचे वाहनांचे ताफे अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी हे उपयुक्त ठरेल.

फ्लीट एज एका अ‍ॅपद्वारे स्मार्टफोन्सवरूनही तात्काळ (रिअल टाइम) तत्त्वावर उपलब्ध करून घेता येईल.

टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहन व्यवसाय विभागाचे अध्यक्ष गिरीश वाघ फ्लीट एजबद्दल माहिती देताना म्हणाले की, डिजिटल तंत्रज्ञान आणि आधुनिक संपर्क साधनांमुळे प्रवासी तसेच माल वाहतुकीचा चेहरा जलद गतीने बदलत आहे.

वाहने आता टेलिमॅटिक्स युनिट्सद्वारे पाठवू शकत असलेल्या समृद्ध डेटाने संपूर्ण लॉजिस्टिक साखळीसाठी अनेक नव्या शक्यतांची द्वारे खुली झाली आहेत.

फ्लीट एजच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक माहिती पुरवून आणि त्यांच्या वाहन ताफ्यावर व त्यांच्या कामकाजावर अधिक दूरस्थ नियंत्रण मिळवून देऊन आम्ही एक नवीन मापदंड स्थापन केला आहे.

आम्ही वाहनांकडून डेटा प्राप्त करत आहोत आणि ग्राहकांना त्यांचे कामकाज सुधारण्यात मदत करण्याच्या दृष्टीने त्याचा वापर करत आहोत. असे ते म्हणाले.

ताफा मालकांना व व्यवस्थापकांना अधिक माहितीपूर्ण निर्णय घेता यावेत त्या दृष्टीने अधिक उपयुक्त व कस्टमाइझ्ड इंटेलिजन्स पुरवण्यासाठी आम्ही फ्लीट एज सोल्युशनमध्ये सातत्याने नवीन सुधारणा करत आहोत व त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही जेवढी अधिक माहिती पुरवू, तेवढ्या अधिक कार्यक्षमतेने ग्राहक ताफ्याची कामगिरी सुधारू शकतात व खर्च कमी करू शकतात.

फ्लीट एज का खास आहे ?

फ्लीट एज सोल्युशन हे सर्व आकारमानांच्या ताफ्यांसाठी उपयुक्त व फायदेशीर आहे. टाटा मोटर्स ट्रक्स आणि बसेसच्या संपूर्ण एमअँडएचसीव्ही बीएसफोर श्रेणीसाठी, तर आयअँडएलसीव्ही व एससीव्ही मॉडेल्समधील निवडक श्रेणीसाठी ते उपलब्ध आहे.

टाटा मोटर्सच्या कनेक्टेड ट्रक्समधील बीएस-6 श्रेणी नवीनतम इनबिल्ट एम्बेडेड सिमने युक्त आहे. फ्लीट एजमध्ये वापरण्यात आलेले टीसीयू सरकारी नियमांनुसार एआयएस 140 ची पूर्तता करणारे आहे.

यामध्ये आपत्कालीन बटन आणि वाहनाचे स्थळ ट्रॅक करून सरकारने प्राधिकृत केलेल्या बॅकएण्ड सर्व्हर्सपर्यंत ते पोहोचवण्याच्या सुविधेसह सुरक्षितता व सुरक्षेच्या सर्व सुविधा आहेत.

टाटा मोटर्सच्या प्रणालींसह बॅकएण्डला पूर्णपणे एकात्मिक असलेले फ्लीट एज ग्राहकांना त्यांच्या व्यवसायातील संपूर्ण कामकाजावर अधिक चांगल्या नियंत्रणासह एण्ड-टू-एण्ड कनेक्टेड अनुभव देते.

ड्रायव्हिंग कामगिरीवर अधिक चांगले नियंत्रण ठेवण्यासाठी वाहनताफ्याचा मालक अत्याधुनिक साधनांच्या माध्यमातून कायम त्याच्या ट्रक ड्रायव्हर्सच्या आणि वाहनाच्या संपर्कात राहिल याची काळजी फ्लीट एज घेते.

ही प्रणाली बेकायदा वाहन हालचालींवरही लक्ष ठेवते आणि यूजर फ्रेंडली आलेखात्मक नकाशामार्फत वाहनाचे स्थळ अचूक निश्चित करते.

फ्लीट एजच्या लाँचसह कनेक्टेड व्यावसायिक वाहनांच्या जगात एक नवीन युग सुरू झाले आहे. टाटा मोटर्स व्यावसायिक वाहनांच्या मदतीने ग्राहकांना नफ्यात निरंतर वाढ साध्य करता यावी या दृष्टीने नवीन अनुभव देण्यासाठी कंपनीने सातत्याने प्रयत्न केला असून फ्लीट एज हा त्याचाच एक भाग आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.