Pimpri : टाटा समूहाने लोकांची मने जोपासत देशही जोपासला – सुमित राघवन

'कलासागर दिवाळी अंक 2019' प्रकाशन समारंभ उत्साहात

एमपीसी न्यूज- टाटा समूह पाण्याचा पुनर्वापर करून निसर्ग जोपासना करत आहे. लोकांची मने जपत राष्ट्रहिताचा नेहमी विचार करून राष्ट्रहिताला नेहमी प्राधान्य देत आहेत. टाटा समूह टाटा कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नाही त्यांचे काम हे नेहमी देशहिताचेच असते. टाटा मोटर्सने लोकांची मने जोपासत देशही जोपासला असे मत मराठी अभिनेता सुमित राघवन यांनी व्यक्त केले.

टाटा मोटर्सच्या कलासागर दिवाळी अंक 2019 चे प्रकाशन आज सोमवारी (दि.14) राघवन यांच्या हस्ते झाले. हा अंक 39 वा आहे. अंकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. याप्रसंगी टाटा मोटर्सचे कर्मचारी आणि कलासागर बक्षीस विजेते युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

चिन्मयी सुमित यांनी आम्हाला सार्थ अभिमान आहे की ” टाटा समूह म्हणजे एक वेगळा देश आहे आणि आमच्या देशात टाटा आहे आणि टाटाच्या देशात आम्ही राहतो ” त्यांनी टाटाच्या आठवणींना उजाळा देत ” जर तुम्हाला वेगात जायचे असेल तर एकटे धावा,पण जर तुम्हाला दूरवर जायचे असेल तर सर्वांना सोबत घेऊन चला” असे सांगितले.

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि दीप प्रज्वलन भरत बारी यांच्या हस्ते झाले.मकरंद गांगल यांनी सेफ्टी सूचना दिल्या. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय वीरेंद्र वायाळ यांनी करून दिला. टाटा मोटर्स अध्यक्ष सुनील सवाई,जयदीप देसाई,अलोक कुमार सिंग,अजॉय लाल यांनी कलासागर मंचाचा आढावा दिला. पारितोषिक वितरण सुमित राघवन,सरफराज मणेर आणि चिन्मयी सुमित यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचान भारत बारी यांनी केले.कलासागर अंकांचे प्रकाशन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. देसाई यांनी प्रमुख पाहुणे सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित यांची मुलाखत घेत कार्यक्रमाला रंगत आणली.

आभार प्रदर्शन मयुरेश कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.