BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पुण्यात टिगोर ईव्हीच्या पुरवठ्यासाठी टाटा मोटर्सचा वाइस ट्रॅव्हल इंडियाशी सामंजस्य करार

0 803
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सने इलेक्ट्रिफिकेशनला चालना देण्यातील आपल्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठल्याची घोषणा आज केली. पुण्यात टिगोर इलेक्ट्रिक व्हेइकल्स (ईव्ही)चा पुरवठा करण्यासाठी त्यांनी वाइस ट्रॅव्हल इंडिया प्रा. लि. (WTi) सोबत करार केला आहे.

.

बीटूबी ग्राहकांना सेवा देणारी पीपल ग्राऊंड ट्रान्सपोर्टेशनमधील डब्‍ल्‍यूटीआयही एक सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी कंपनी आहे. ग्राहकांना सेवा देतानाच शाश्वततेला बळकटी देण्याच्या आपल्या बांधिलकीला जपत ही कंपनी पुण्यातील आपल्‍याया वाहन ताफ्यात टिगोर ईव्हीचा भरणा करणार आहे. पुण्यातील बाणेर येथील काँक्रोड मोटर्स येथे टाटा मोटर्सच्या टीमने वाइस ट्रॅव्हल इंडियाच्या अधिकाऱ्यांना टिगोर ईव्हीचा पहिला ताफा हस्तांतरित केला.

  • यावेळी बोलताना अशेष धार, हेड-सेल्‍स,मार्केटिंग अँड कस्‍टमर केअर, इलेक्ट्रिक व्‍हेइकल बिझनेस युनिट, टाटा मोटर्स म्हणाले, “आम्‍हाला पुण्‍यात धावणा-या डब्‍ल्‍यूटीआय कॅब्‍सच्‍या ताफ्यात शून्य उत्सर्जन करणाऱ्या वाहनांचा समावेश करण्‍याच्‍या पुरोगामी उपक्रमात त्यांची साथ देताना आनंद होत आहे. आम्‍हाला खात्री आहे की, पुणेकर ड्रायव्हिंग अनुभवाची प्रशंसा करतील आणि याचा आनंद घेतील. टाटा मोटर्स ग्राहकांसाठी ग्रीनमोबिलिटी उपाय सादर करण्‍याच्‍या दिशेने काम करणे सुरुच ठेवेल.”

देशभरात इलेक्ट्रिक दळणवळणाला चालना देण्यात टाटा मोटर्स सक्रिय भूमिका बजावत आहे. भारतासाठी एका शाश्वत भविष्याची उभारणी करण्यासाठी ही कंपनी विविध भागीदाऱ्यांच्या माध्यमातून विविध इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांच्या पर्यायांवर काम करत आहे.

यावेळी वाइस ट्रॅव्‍हलइंडिया प्रा.लि.चे सीईओ अशोक वशिष्ठ म्हणाले, “सार्वजनिक दळणवळणाचे विविध पर्याय आणि अशा सेवांकडून ग्राहकांच्या असलेल्या अपेक्षा समजून घेण्याची आम्हाला मिळालेली संधी यावर आमचा व्यवसाय उभा आहे. जागतिक दर्जाची सेवा देऊन आमच्या ग्राहकांची उद्दिष्टे पूर्ण करण्यास आम्ही बांधिल आहोत. शून्य उत्सर्जन आणि ईव्हीच्या देखभालींसाठी येणारा अत्यल्प खर्च यामुळे ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षांना आर्थिक आणि शाश्वत स्वरुपात पूर्ण करणे आम्हाला शक्य होईल.”

.

HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: