Pimpri: ट्रॅक चालक आणि फ्लिट ऑपरेटर्सला अखंड पुरवठ्यासाठी टाटा मोटर्सचा संपूर्ण पाठिंबा

pimpri: Tata Motors provides holistic support to truck drivers and fleet operators for seamless supplies सध्याच्या अभूतपूर्व आपत्तीच्या काळात टाटा मोटर्सने ट्रक चालक, छोटे वाहतुकदार, मध्यम दर्जाचे वाहतुकदार आणि वाहनांचे मालक यांच्यासमवेत संवाद साधून सध्याचे आणि भविष्यातील प्रश्न शोधून काढत आहेत

एमपीसी न्यूज- भारतातील सर्वांत मोठे व्यावसायिक वाहन उत्पादक टाटा मोटर्सने देशभरात वाहतुकीसाठी आवश्यक सर्व सेवांचा पुरवठा अखंड सुरू ठेऊन वाहतुकीच्या इकोसिस्टिमला संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. सध्याच्या अभूतपूर्व आपत्तीच्या काळात टाटा मोटर्सने ट्रक चालक, छोटे वाहतुकदार, मध्यम दर्जाचे वाहतुकदार आणि वाहनांचे मालक यांच्यासमवेत संवाद साधून वाहतूक साखळीतील प्रत्येक टप्यावरील सध्याचे आणि भविष्यातील प्रश्न शोधून काढले आहेत आणि परिणामकारक व परिपूर्णपणे ते सोडवण्यासाठी भागीदार होऊन मदत करायला सुरुवात केली आहे.

ट्रक चालक आणि वाहतुकदारांसोबत भागीदारी

* प्रत्यक्ष आघाडीवर लढणाऱ्या आणि देशभरात माल पोहोचविणाऱ्या चालकांसाठी देशभरातील अत्यंत रहदारीच्या राज्य महामार्गावर, इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपांवर आणि टाटा मोटर्सच्या संपूर्ण ऑपरेशन नेटवर्कवर असलेल्या ‘सारथी आराम केंद्रा’मध्ये अन्न, मास्क आणि सॅनिटायजर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या सेवा आणि सुविधांचा हजारो ट्रक चालकांनी फायदा घेतला आहे.

लॉकडाउनकाळात देशभरातील ट्रक चालक आणि वाहतुकदारांना संपर्क साधता यावा म्हणून 24×7 हेल्पलाइन १८०० २०९ ७९७९ सुरू करण्यात आली आहे. आलेल्या विनंत्यावर तत्परतेने कार्यवाही करण्यासाठी ९०० इमर्जन्सी टीम तयार करण्यात आल्या असून, महत्त्वाचे ट्रान्सपोर्ट हब आणि कॉरिडॉरमध्ये या टीम काम करत आहेत.

टाटा मोटर्सच्या १४०० वर्कशॉप्स आणि २१ सुसज्ज वेअर हाउसेसमध्ये काम केलेल्या लोकांतून प्रशिक्षित असे ४००० टेक्निशियन इमर्जन्सी टीममध्ये काम करत आहेत.

या २१ वेअर हाउसमध्ये वाहनांचे सर्व स्पेअर पार्ट पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, ती वाहनांना सहज संपर्क करता येतील. अशा ठिकाणी आहेत. वाहतुकीचे चक्र फिरते ठेण्यासाठी वाहनांशी संबंधित आतापर्यंत आलेल्या १०,००० हून अधिक विनंत्यांवर तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे.

* नव्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरना (एसओपी) अनुसरून जेवढ्या लवकरात लवकर शक्य आहे. तितक्या लवकर आम्ही वर्क शॉप उघडत आहोत आणि आवश्यक ती दुरुस्ती व सर्व्हिसेंग सेवा पुरवत आहोत.

कमीतकमी संवाद, पुरेसे फिजिकल डिस्टन्स राखून, वाहनाशी संपर्क आणि सॅनिटायझेशन यांसारख्या गोष्टींचे काटेकोर पालन करूनच ग्राहकांशी व्यवहार केला जात आहे.

* राष्ट्रीय लॉकडाउनच्या काळात ज्या व्यावसायिक वाहनांच्या वॉरंटी संपत आहेत. त्यांच्या वॉरंटीत वाढ करण्यात आली आहे. तसेच, ग्राहकांच्या हितासाठी टाटा सुरक्षा वार्षिक मेंटेनन्स कराराची काल मर्यादाही वाढवण्यात आली आहे.

कंपनीने सुरू केलेल्या उपक्रमांबद्दल टाटा मोटर्ससच्या कस्टमर केअर आणि सीव्हीबीयू विभागाचे ग्लोबल हेड आर. रामकृष्णन म्हणाले, ”सर्व प्रकारचा पुरवठा सुरू राहावा यासाठी अविरतपणे कार्यरत राहून देशाची चाकं फिरत राहतील याची दक्षता घेण्याची अव्दितीय भूमिका बजावलेले ट्रक चालक आणि वाहतूकदार हे तर या युद्धातील आघाडीचे वीर आहेत.

भारतातील आघाडीची व्यावसायिक वाहन निर्माण कंपनी असल्यामुळे या वाहतूकदार व चालकांपैकी बहुतांश जण आमची वाहने वापरतात आणि त्यांना मदतीसाठी पहिल्यांदा हाक मारायची असेल तर ते आम्हाला निवडतात.

या अभूतपूर्व संकटकाळात त्यांना आणि त्यांच्या वाहनांना आवश्यक असलेला संपूर्ण पाठिंबा देण्यासाठी आम्ही एक भागीदार म्हणून कटिबद्ध आहोत. एक सर्व समावेशक भूमिका घेऊन आम्ही त्यांची कामे आणि दैनंदिन आयुष्य सोपे करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.”

पुरवठादार, डीलर्स आणि गाड्यांचे मालक यांच्याशी भागीदारी
एकूणातच आर्थिक व्यवहारांचे प्रमाण अचानकच कमी झाल्यामुळे संपूर्ण लॉजिस्टिक क्षेत्रालाच फटका बसला आहे. टाटा मोटर्सची उपकंपनी असलेल्या टाटा मोटर्स फायनान्सने (टीएमएफ) आपल्या ३,००० ग्राहकांशी संवाद साधला.

प्रत्येक विभागातील ग्राहकांचा यात समावेश आहे. या संवादातून या ग्राहकांचे मुख्य प्रश्न जाणून घेतले आणि त्यानुसार त्यांना कंपनी मदत देत आहे. न वापरलेली वाहने चालू करणे, वाहनांचा वापर कमी होणे याचबरोबर खेळत्या भांडवलाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेले ऑपरेशनल व्हाएबलिटीचे आव्हान असे प्रश्न सध्या या सगळयांसमोर आहेत.

कोविड 19 मुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व विनाशामुळे त्यांचे विकोपाला गेलेले दु:ख आणि अडचणी समजून घेत रिझर्व्ह बँकेने आपल्या सर्व किरकोळ आणि कॉपोरेट ग्राहकांना ईएमआय भरण्यासाठी मोरॉटोरियमची सोय उपलब्ध करून दिली आहे.

ती सोय ज्यांनी घेतली आहे. त्यांच्या कालमर्यादेत टीएमएफने वाढ करून दिली आहे. अशा प्रकारची सोय उपलब्ध करून देणारी टीएमएफ ही पहिली आर्थिक संस्था आहे. त्याचबरोबर टीएमएफने ग्राहकांच्या गरजा आणि क्षमतांवर आधारित सुविधांचा पोर्टफोलिओ उपलब्ध करून दिला आहे.

त्यामध्ये खालील मुद्यांचा समावेश आहे
* डीलर आणि पुरवठादारांकडच्या येणाऱ्या सर्व्हिसिंगच्या वाहनांसाठीचा खर्च आणि ३ ते ४ महिन्यांचा निश्चित खर्च सुरळीतपणे चालावा आणि मूल्य साखळीतील भांडवल खेळतं राहण्यासाठी ओपेक्स फंडिंग योजना सुरू केली आहे.

किरकोळ वाहन खरेदी करणाऱ्यांच्या मासिक प्राप्तीला अनुसरून त्यांच्या आताच्या कर्जाचे हप्ते पुन्हा नव्याने पाडून देण्यासाठी कर्जाची फेररचना करण्यात येत आहे. ६ ते ९ महिन्यांमध्ये त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरळीत झाल्यानंतर ते हप्त्याची रक्कम पुन्हा वाढवून कर्ज जलद फेडू शकतात.

रिझर्व्ह बँकेच्या सध्या सुरू असलेल्या योजनेनुसार पात्र ठरणारे ग्राहक आणि एमएसएमई गटाच्या व्याख्येनुसार त्यात समावेश असणारे ग्राहक या योजनेचा फायदा घेऊ शकतात.

* मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या आर्थिक अडचणींची पूर्तता करण्यासाठी पुढच्या काही महिन्यांसाठी खेळतं भांडवल देणारी योजना. टीएमएफकडे आधीपासून असलेल्या तारणावर किंवा त्यांच्या कर्ज मुक्त वाहनांवर हे भांडवल उपलब्ध करून देण्यात येईल.

कोविडच्या आधी बिल भरण्याची असलेली मुभा ४५ दिवसांची होती ती आता वाढवून ९० दिवसांची करण्यात येईल. जेणेकरून या बिलात सवलत देण्याच्या योजनेमुळे पेमेंट चक्र चालू ठेवणे सोपे होईल.

* किरकोळ वाहन खरेदीदारांसाठी कर्जाच्या योजना विकसित केल्या जात आहेत. जेणेकरून त्यांना कर्ज आधार मिळून खेळतं भांडवल राखायला मदत होईल. ग्राहक या कर्ज योजनांचा उपयोग करून इंधन खरेदी करू शकतात. फास्टटॅगचे रिचार्ज करू शकतात. वाहनाच्या सर्व्हिसिंग, इन्शुरन्स आणि रोड परमिट टॅक्स इ. सेवांसाठीही या सेवेचा फायदा घेऊ शकतात.

* पहिल्या १२ महिन्यांसाठी कमीत-कमी किमतीच्या हप्त्यांवर नव्या वाहनांची खरेदी करण्याची योजना उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच नव्या वाहनाच्या कर्जासोबतच व्यवसायासाठी खेळतं भांडवलही कर्जाद्वारे उपलब्ध करून दिले जाईल.

त्यासाठी मात्र तारण करणे गरजेचे आहे. या योजनेमुळे नवे वाहन घेतलेले ग्राहक सहजपणे काही महिन्यांतच नव्या व्यवसायात स्थिरावू शकतील.

कंपनीने सादर केलेल्या नवीन आर्थिक योजनांबाबत टाटा मोटर्सच्या फायनान्स विभागाचे सीईओ सम्राट गुप्ता म्हणाले, ‘‘देशातील सर्वात मोठ्या एनबीएफसींपैकी एक असलेली आणि व्यावसायिक वाहनांना अर्थपुरवठा करण्यासाठी वचनबद्ध असलेली कंपनी म्हणून आमच्या सर्व भागधारकांच्या, विशेषकरून आमच्या ग्राहकांच्या आर्थिक यशस्वीतेवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.

कोविडचे संकट आल्यानंतर आमच्या ग्राहकांसमोर प्रत्यक्ष असलेल्या आव्हानांची माहिती आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने करून घेतली आणि त्यानुसारच त्यांच्या उदरनिर्वाहासाठी सर्वाधिक आवश्यक असलेल्या खेळत्या भांडवलाच्या पूर्ततेसाठी आम्ही विविध योजना आखल्या आहेत.

या संकटकाळात आम्ही आमच्या ग्राहकांशी केलेल्या या भागीदारीमुळे आमचे नाते दीर्घ काळासाठी बळकट झाले आहे.’’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.