Pimpri : टाटा मोटर्स कामगारांना दरमहा नऊ हजार रुपयांची प्रत्यक्ष वेतनवाढ

गुणवत्ता, उत्पादकता आणि सुरक्षेशी संबंधित प्रोत्साहनपर वेतनवाढीचा मिळणार लाभ

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्स, पुणेचे व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये आज (सोमवारी) त्रैवार्षिक वेतनवाढ करार सौहार्दपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. या करारामुळे कंपनीतील कामगारांना दरमहा नऊ हजार रुपयांची प्रत्यक्ष वेतनवाढ मिळणार आहे. याखेरीज गुणवत्ता, उत्पादकता आणि सुरक्षेशी संबंधित प्रोत्साहनपर वेतनवाढीचाही लाभ कामगारांना मिळणार आहे. यावेळी प्रथमच कमर्शियल व्हेईकल बिझनेस युनिट (सीव्हीबीयू) आणि पॅसेंजर व्हेईकल बिझनेस युनिट (पीव्हीबीयू) या दोन्ही प्रकल्पांसाठी एकत्र वाटाघाटी व करार करण्यात आला.

दि. 1 सप्टेंबर 2018 ते 31 ऑगस्ट 2021 या कालावधीसाठी हा करार अंमलात येणार असून टाटा मोटर्समधील कामगारांना या कराराद्वारे दरमहा 9000 रुपयांची प्रत्यक्ष वाढ आणि तसेच गुणवत्ता, उत्पादकता आणि सुरक्षा यावर आधारित इन्सेटीव्हच्या स्वरूपात अप्रत्यक्ष वेतनवाढ मिळणार आहे. या पगारवाढीत कामगारांना देण्यात येणाऱ्या इतरही सेवा-सवलतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. या कराराचा लाभ सुमारे साडेसहा हजार कामगारांना मिळणार आहे.

  • कंपनीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यवाहक अधिकारी सतीश बोरवणकर यांच्या उपस्थितीत व्यवस्थापन व युनियनचे पदाधिकारी व प्रतिनिधी यांनी वेतनवाढ करारावर सह्या केल्या.
_MPC_DIR_MPU_II

या वेतनवाढीच्या करारावर व्यवस्थापनातर्फे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यवाहक अधिकारी सतीश बोरवणकर, सीव्हीबीयू प्रकल्प प्रमुख अलोक सिंग, पीव्हीबीयू प्रकल्प प्रमुख जयदीप देसाई, वरिष्ठ महाव्यवस्थापक (प्रॉडक्ट लाईन-पीव्हीबीयू) राजेश देहनकर, मनुष्यबळ विकास विभागाचे (सीव्हीबीयू) महाव्यवस्थापक सरफराज मणेर, आयसीव्ही फॅक्टरीचे महाव्यवस्थापक दीपक आंबडेकर, पेंट फॅक्टरीचे महाव्यवस्थापक मुकेश मालू, प्रोसेस मेथड अँड टूल्स ईआरसी विभागाचे महाव्यवस्थापक नंदगोपाल वैद्य, गियर फॅक्टरीचे महाव्यवस्थापक सुनील सवई, विंगर अॅसेंब्ली विभागाचे महाव्यवस्थापक विलास गोडसे, पीई मॅन्युफॅक्चरिंग विभागाचे महाव्यवस्थापक हेमंत अनावकर, मनुष्यबळ विकास विभागाच्या (पीव्हीबीयू) महाव्यवस्थापक अनुराधा दास व ईआर, सीएसआर व कौशल्य विकास विभागाचे महाव्यवस्थापक रवी कुलकर्णी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

  • टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनतर्फे अध्यक्ष समीर धुमाळ, कार्याध्यक्ष सतीश काकडे, सरचिटणीस उत्तम चौधरी, खजिनदार यशवंत चव्हाण, सहचिटणीस गणेश फलके, कार्यकारिणी सदस्य महेंद्र कदम, आबिद आली सय्यद, प्रतिनिधी विलास सपकाळ, कार प्लांट युनिट अध्यक्ष उमेश म्हस्के, सरचिटणीस अनिल भोसले, प्रतिनिधी संतोष संकपाळ, विक्रम बालवडकर यांनी सह्या केल्या.

टाटा मोटर्स आपल्या व्यवसायाचा विस्तार आंतरराष्ट्रीय स्तरावर करून जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करू पाहात आहे. त्यासाठी टाटा मोटर्स उत्पादित करीत असलेली उत्पादने ही जागतिक दर्जाची असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी टाटा मोटर्समध्ये गुणवत्तेसोबत वाहन उत्पादकतेला सुद्धा अग्रक्रम दिला जातो. त्याच उद्देशाने कार्यप्रणालीच्या मोजमापनाशी संबंधित गुणवत्ता व डीआरआर या संकल्पनांचा समावेश करून आचरणात आणण्याचे व्यवस्थापन व कामगारांनी ठरविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1