Pimpri : टाटा पॉवर आणि टाटा मोटर्स एकत्र येऊन देशातील इलेक्ट्रिक दळणवळणाला चालना देणार

महत्त्वाच्या शहरांमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार; प्रारंभिक ऑफर म्हणून टाटा मोटर्स ईव्हीकडून ग्राहकांना पुढील 3 महिन्यांसाठी मोफत चार्जिंग सुविधा

एमपीसी न्यूज – टाटा पॉवर आणि टाटा मोटर्स यांनी आर्थिक वर्ष 20च्या अखेरीपर्यंत वेगवान चार्जिंगची सुविधा देणारी ३०० केंद्रे उभारण्यासाठी भागीदारी करत असल्याची घोषणा केली आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, बेंगळुरू आणि हैदराबाद अशा पाच महत्त्वाच्या शहरांमध्ये ही केंद्रे उभारली जातील. या दोन्ही कंपन्यांनी एकत्रितरित्या पुण्यात त्यांच्या टाटाच्या पहिल्या सात चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन केले. यामुळे, शहरातील ईलेक्ट्रिक दळणवळणाला चालना मिळणार आहे.

पुढील दोन महिन्यांत इतर चार शहरांमध्ये आणखी 45 चार्जर्स बसवण्यात येणार आहेत. टाटा मोटर्स डीलरशीप्स, टाटा ग्रुपची काही रीटेल आऊटलेट्स तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी ही केंद्रे उभारली जातील.

  • सुरूवातीच्या 50 चार्जर्ससाठी भारत स्टँडर्ड (15 किलोवॅट) मानांकनानुसार चालवल्या जाणाऱ्या या चार्जर्सचे कार्यचलन टाटा पॉवरकडे असेल. अधिक पुढे जात आम्ही 30-50 किलोवॅट डीसी सीसीएसर स्टँडर्ड मानांकनानुसार चालवली जाणारी चार्जिंग स्टेशन्स देखील सादर करणार आहोत. वरील मानांकनांसाठी सुयोग्य अशा कोणत्याही गाडीसाठी इलेक्ट्रिक वाहन चालकाला हे चार्जर्स वापरता येतील. टाटा मोटर्स ईव्ही ग्राहकांसाठी टाटा पॉवर आणि टाटा मोटर्सतर्फे आकर्षक दर सादर करण्यात आले आहेत.

याप्रसंगी टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीर सिन्हा म्हणाले, “हरित तंत्रज्ञान पर्याय उपलब्ध करून देण्याची सरकारची महत्त्वाकांक्षा ध्यानात घेऊन भारताला ईव्हीसाठी सज्ज करण्यास आणि भारतातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यास आम्ही बांधिल आहोत. सर्व भारतीयांना वेगवान ईव्ही चार्जिंग सहज उपलब्ध व्हावे, हा आमचा उद्देश आहे. यात टाटा मोटर्ससोबत भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद आहे. त्यांच्यासोबत आम्ही संभाव्य ईव्ही चालकांना सोयीची पडतील, अशी प्राधान्य क्रमाची ठिकाणे शोधली आहेत.”

  • या भागीदारीबद्दल टाटा मोटर्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक गुंटर बुश्चेक म्हणाले, ” भारतात सर्वसमावेशक ईव्ही चार्जिंगची सुविधा विकसित करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकताना टाटा पॉवरसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद आहे. परिपूर्ण परिसंस्था पर्याय आणि आमच्या ग्राहकांना मन:शांती देण्याच्या आमच्या प्रवासात ही भागीदारी म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा आहे. दळणवळणाचे शाश्वत पर्याय देण्यास आम्ही बांधिल आहोत आणि ग्राहकांसाठी महत्त्वाकांक्षी ई-मोबिलिटी पर्याय सातत्याने सादर करून देशातील ईलेक्ट्रिक व्हेइकल्सच्या वापरासाठी प्रयत्न करत राहू.”

मुंबईत सध्या टाटा पॉवरच्या ईव्ही सुविधांमध्ये 42 केंद्रे आहेत आणि हेदराबाद, बेंगळुरु व दिल्ली अशा अनेक शहरांमध्ये या सेवा उपलब्ध आहेत. विविध ठिकाणी अशी 85 चार्जिंग केंद्रे सध्या सुरु आहेत. एचपीसीएल, आयओसीएल आणि आयजीएल रीटेल आऊटलेट्समध्ये व्यावसायिक पातळीवरील ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी कंपनीने महत्त्वाचे सामंजस्य करार केले आहेत. याआधीही कंपनीने टाटा मोटर्ससोबत भागीदारी करत महाराष्ट्रात सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्टेशन्स स्थापून ई-मोबिलिटीला चालना देण्याच्या राज्य सरकारच्या मोहिमेला साह्य केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like