_MPC_DIR_MPU_III

Pimpri : शिक्षक वर्गीकरणाचा विषय सत्ताधारी भाजपने नेला रेटून

पदाधिका-यांनी प्रत्येकी दहा लाख रूपये घेतल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – पती-पत्नी एकत्रीकरण, एकतर्फी सेवा वर्गीकरण अशा जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचा महापालिका शाळेत वर्गीकरणाचा विषय सत्ताधारी भाजपने रेटून नेला. विरोधकांना बोलून न देता विषय मंजूर केला. पदाधिका-यांनी शिक्षकांकडून दहा-दहा लाख रूपये घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला. विरोधकांनी या विषयावर बोलण्याची मागणी करत महापौरांच्या आसनासमोर धाव घेतती. राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांच्या विरोधाला न जुमानता हा विषय सत्ताधा-यांनी मंजूर केला. त्यामुळे विरोधकांच्या आरोपाला पुष्टी मिळत आहे.

_MPC_DIR_MPU_IV

पिंपरी-चिंचवड महापालिकेची नोव्हेंबर महिन्याची तहकूब महासभा आज (गुरुवारी)आयोजित करण्यात आली होती. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. पती-पत्नी एकत्रीकरण, एकतर्फी सेवा वर्गीकरण अशा जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचा पिंपरी महापालिका शाळेत वर्गीकरण करण्याचा विषय सभेसमोर होते. विषयपत्रिकेवर सहाव्या क्रमांकावर हा विषय होता.

_MPC_DIR_MPU_II

पती-पत्नी वर्गीकरणाचा विषय भाजपच्या नगरसेविका तथा शिक्षण समितीच्या सदस्या शारदा सोनवणे यांनी वाचला. त्याला समितीच्या उपसभापती शर्मिला बाबर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर महापौर जाधव यांनी क्षणाचाही विलंब न करता शिक्षक वर्गीकरणाचा विषय मंजूर केल्याचे जाहीर केले. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आम्हाला बोलून दिले जात नसल्याचा आरोप करत महापौरांच्या आसनासमोर धाव घेत महापौरांना याचा जाब विचारला. भाजपच्या काही पदाधिका-यांनी शिक्षकांकडून पाच ते दहा लाख रुपये घेतल्याचा आरोप करत याविषयावर आम्हाला बोलायचे होते, असे साने यांनी सांगितले.

त्यावर महापौर जाधव यांनी तुम्ही अगोदर जागेवर जाऊन बसा, जागेवरुन बोला. तुम्हाला बोलण्याची परवानगी दिली आहे. त्यावरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यांनतर राष्ट्रवादी ग्रेसच्या इतर नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेतली. साने यांनी तर ठिय्या मांडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या भूमिकेचा निषेध करत गोंधळ घातला. त्यामुळे ही महासभा सायंकाळी पाच वाजेपर्यंत तहकूब करण्याची सूचना सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केली. त्यानंतर महापौरांनी महासभा सायंकाळी पाच वाजेपर्यंत तहकूब केली.

दरम्यान, सायंकाळी सहा वाजता पुन्हा या तहकूब सभेला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते  दत्ता साने, माजी महापौर मंगला कदम यांनी या विषयावर बोलण्याची मागणी केली. साने यांनी दर महापौरांच्या आसनासमोरील कुंडी उचलली. राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापौरांनी त्यांना बोलू न देता सभेचे कामकाज रेटून नेले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.