Pimpri: महापालिकेचे मंत्रालयीन कामकाज पाहण्यासाठी ‘समन्वयकां’ची नेमणूक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेशी संबंधित मंत्रालयातील प्रशासकीय, अभियांत्रिकी कामकाज पाहण्यासाठी ‘समन्वयक’ म्हणून अधिकारी, कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी प्रशासन अधिकारी राजेश आगळे, लिपिक आकाश चव्हाण, अभियांत्रिकी कामकाजासाठी स्थापत्य विभागाचे उपअभियंता विजय भोजने, दीपक पाटील यांची ‘समन्वयक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विधानमंडळ कामकाजाच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेशी संबंधित प्राप्त होणारे तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, चर्चा याबाबतची उत्तरे राज्य सरकार अथवा विधीमंडळाला द्यावी लागतात. त्यासाठी महापालिकेच्या विधानमंडळ कामकाजाकरिता महापालिका स्तरावर प्रशासकीय कामकाजासाठी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त, प्रशासन अधिकारी (1) आणि अभियांत्रिकी विभागाशी संबंधित कामकाजासाठी सह शहर अभियंता राजन पाटील यांची ‘समन्वय अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

_MPC_DIR_MPU_II
  • तथापि, प्रत्येक वेळेस वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधून पाठपुरावा करणे यथोचित होत नाही. त्यामुळे प्रशासकीय आणि तांत्रिक कामकाजासाठी आणि सरकारकडील प्रकरणांचा पाठपुरावा, माहिती घेण्यासाठी अधिकारी, कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी प्रशासन अधिकारी राजेश आगळे, लिपिक आकाश चव्हाण, अभियांत्रिकी कामकाजासाठी स्थापत्य विभागाचे उपअभियंता विजय भोजने, दिपक पाटील यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.