Pimpri: भाजपची जम्बो कार्यकारिणी, भाजयुमोच्या अध्यक्षपदी संकेत चोंधे, महिलाध्यक्षपदी उज्वला गावडे

संघटन सरचिटणीसपदी अमोल थोरात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर भाजपची 74 जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी संकेत चोंधे, महिला मोर्चा अध्यक्षापदी उज्वला गावडे तर संघटन सरचिटणीसपदी अमोल थोरात, सरचिटणीस बाबू नायर, मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे यांची वर्णी लागली आहे. बारा उपाध्यक्ष, सोळा चिटणीस, पंधरा जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशी एकूण 74 जणांची यादी जाहीर करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने शहर भाजपाची जिल्हा कार्यकारिणी रविवारी (दि.15) जाहीर करण्यात आली. नवनियुक्त पदाधिका-यांना पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यामध्ये बारा उपाध्यक्ष, सोळा चिटणीस, पंधरा जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशी एकूण 74 जणांची यादी जाहीर करण्यात आली.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, लेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, ज्येष्ठ नेत्या उमा खापरे, गटनेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे आदी उपस्थित होते.

….अशी आहे कार्यकारिणी
संघटन सरचिटणीस पदावर अमोल थोरात. सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे, बाबू नायर. चिटणीस म्हणून अनिल चव्हाण, बिभीषण चौधरी, गोरख तरस, योगेश सोनवणे, अजय सायकर, दत्ता गव्हाणे, विशाल वाळुंजकर, माणिक फडतरे, मधुकर बच्चे, कुलदीप परांडे, दीपक मोंडवे, नंदू कदम काम पाहतील. उपाध्यक्षपदावर शेखर चिंचवडे, राम वाकडकर, काळूराम बारणे, अनिल लोंढे, अर्जुन ठाकरे, किरण पाटील, अजय पाताडे, अण्णा गर्जे, कमल मलकानी, देविदास पाटील, नंदू दाभाडे, उत्तम केंदळे यांची निवड करण्यात आली आहे.

प्रसिध्दी प्रमुख संजय पटनी, कोषाध्यक्ष सचिन तापकीर, महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष सुदाम यशवंत मराडे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष सुभाष सरोदे, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष फारुक इनामदार. आय.टी. सेल शरद दराडे व सोशल मिडीया सेल अमोल दामले ; उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष :- विकास मिश्रा ; कामगार आघाडी उपाध्यक्ष :- प्रकाश अर्जुन मुगडे ; किसान मोर्चा अध्यक्ष संतोष तापकीर, दक्षिण भारतीय आघाडी अध्यक्ष :- राकेश करुणाकरन नायर ; शिक्षक आघाडी अध्यक्ष :- धनंजय जगताप, वैद्यकीय आघाडी अध्यक्ष :- डॉ. प्रदीप ननवरे;

सहकार आघाडी अध्यक्ष :- सूर्यकांत संभाजी गोफणे ; सहकार आघाडी (गृह निर्माण) अध्यक्ष :- प्रदीपकुमार बेंद्रे ; सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष :- धनंजय शाळीग्राम ; वकील आघाडी – देविदास राजाराम शिंदे ; संयोजक प्रज्ञावंत आघाडी :- दीपक नारायण कुलकर्णी ; व्यापारी आघाडी अध्यक्ष :- राजेंद्र हरिभाऊ चिंचवडे ; उद्योग आघाडी अध्यक्ष :- निखील काळकुटे ; भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष :- रघुनंदन रामभाऊ घुले ; दिव्यांग प्रकोष्ठ :- शिवदास किसान हंडे ; आर्थिक प्रकोष्ठ :- संजीवनी इंद्रभूषण पांडे ; माजी सैनिक प्रकोष्ठ :- सोपान गेणुजी धामणे ; ट्रान्सपोर्ट प्रकोष्ठ :- दीपक भोंडवे ; झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष मनोज पवार

जिल्हा कार्यकारिणी सदस्य :- रोहिदास तरस, राजेंद्र राजापुरे, पाटील बुवा चिंचवडे, धर्मा पवार, विशाल कलाटे, जयनाथ काटे, हर्षल सुरेश नढे, सुरेश म्हेत्रे, लालासाहेब मोरे, राहुलशेठ गवळी, शितल वर्णेकर, नाना सासवडे, देवदत्त लांडे, आबा कोळेकर, राधिका बोरलीकर ; कार्यालयीन प्रमुख :- संजय अंबादास परळीकर अशी एकूण 78 जणांची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.