Pimpri : पिंपरी रेल्वेस्थानकावर आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

एमपीसी न्यूज – पिंपरी रेल्वेस्थानकावर आज (गुरुवारी) दुपारी दीडच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. तो मृतदेह हमालाचा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर मृतदेह असल्याची माहिती पिंपरी लोहमार्ह पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. मृताचे वय अंदाजे 30 वर्षे, उंची पाच फूट पाच इंच, रंग सावळा, बांधा सडपातळ, केस व दाढी मिशा काळे पांढऱ्या रंगाच्या वाढलेल्या, अंगात काळे पांढरे पट्टे असणारा शर्ट असे वर्णन आहे.

  • तो हमाल असून आजारपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या वर्णनाच्या व्यक्तीबाबत माहिती असल्यास पिंपरी लोहमार्ग पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.