Pimpri : वीरशैव माळी समाजाचा रविवारी वधू-वर सूचक मेळावा

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय वीरशैव माळी समाजोन्नती परिषद, शिवप्रसाद विकास परिषद सांगली व शिवप्रसाद नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने वीरशैव माळी समाजाचा वधू-वर सूचक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवारी (दि. 3 नोव्हेंबर) सकाळी अकरा वाजता सांगली येथील कुपवाडा रोडवर असलेल्या वीरशैव माळी मंगल कार्यालयात होणार आहे.

सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई, विजापूर, बेळगाव व महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील सर्व जिल्ह्यातील वीरशैव माळी समाजाच्या मुला-मुलींसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. माळी समाजाच्या मुला-मुलींचा वैवाहिक प्रश्न सुखकर होण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा मेळावा आयोजित करण्यात येतो.

माळी समाजातील समाज बांधवांनी मेळाव्यासाठी नाव नोंदणी करण्यासाठी शिवप्रसाद नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली, वीरशैव माळी मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर कुपवाड रोड, सांगली (फोन – 0233 2305755, 9922386605) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन अध्यक्ष विजयराव धुळूबुळू यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.