DehuRoad : भरधाव कारची रस्त्यालगतच्या टपऱ्यांना धडक; एकजण गंभीर

 मद्यधुंद वाहनचालक पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – देहूरोड येथील परिसरात भरधाव होंडा अमेज कारने रस्त्यालगत असलेल्या पाच ते सहा टपऱ्यांना जोरदार धडक दिली. यातील चायनीज टपऱ्यावरील एकजण गंभीर जखमी झाल्याचे सूत्रांकडून समजले आहे.

किवळे मुकाई चौक येथे आज रात्री साडे नऊच्या सुमारास हा प्रकार घडला असून याप्रकरणी मद्यधुंद वाहनचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार थेट रस्त्यालगतच्या टपऱ्यांना धडक देत निघाली. या अपघातात मोटारसायकलचे नुकसान झाले आहे घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती, असे सूत्रांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.