Pimpri : महापालिकेत संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

एमपीसी न्यूज – संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिम्मित पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प हार घालून अभिवादन केले. मानवता आणि निसर्ग प्रेमाची शिकवन देणाऱ्या संत सेवालाल महाराज जयंती पालिकेत उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालून अभिवादन केले.पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमाला स्थायी समिती सभापती विलास मडिगेरे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी तेलंगणा राज्यात झाला होता.संत सेवालाल महाराज मानवता, भूतदया, निसर्ग प्रेम आणि अहिंसेचे पुरस्कर्ते होते. सत्य हाच खरा धर्म आहे आणि नेहमी सत्याचेच आचरण करावे, अशी शिकवण त्यांनी सर्व जगाला दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.