Pimpri : प्राधिकरणात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – जगभरात 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर नगरसेवक अमित गावडे यांच्या संयोजनातून प्रेमगंध मेडिटेशन ध्यान साधना परिवार आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्राधिकरण येथे योग दिवस साजरा करण्यात आला.

प्राधिकरणातील सेक्टर 27 मधील माऊली उद्यानात योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेवक अमित गावडे, अद्वैत कशाळीकर, सारिका कशाळीकर, संघाचे अध्यक्ष सुभाष जोशी, माजी अध्यक्ष मुथियान, चिखलीकर, बाळकृष्ण हिंगे, बाळासाहेब साळुंखे, शाम परदेशी, शिंगवी प्रेमगंध परिवारातील साधक वर्ग आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आदी यावेळी उपस्थित होते.

  • कार्यक्रमात उपस्थितांनी योग प्रात्यक्षिके केली. विविध योगासनांची माहिती देऊन त्याचे फायदे सर्वांना सांगितले. नियमित योग साधना केल्यास कोणताही असाध्य रोगांवर नियंत्रण मिळवता येते. धक्काधक्कीच्या जीवनात मनाची शांतता आणि एकाग्रता कमी होत आहे. नियमित योग केल्यास ती प्राप्त करता येते. याबरोबरच योगाच्या अनेक फायद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी साधकांनी श्वासासह, ओंकार व ध्यान-धारणा बाबतचे प्राणायाम सादर केले. तसेच उपस्थितांकडून करून घेतले. कर्यक्रमाचे नियोजन सुभाष जोशी, ज्ञानेश्वर खुळे, भगवान महाजन, जगन्नाथ वैद्य, शामसुंदर परदेशी यांनी केले. सूत्रसंचालन चांदबी सय्यद यांनी केले. आयोजन प्रेमगंध ध्यान-साधना परिवाराने केले. कार्यक्रमाचे पूर्ण संयोजन नगरसेवक अमित गावडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.